१ जुलैला महावितरण ६ ठिकाणी वेबिनारच्या माध्यमातून साधणार संवाद - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ जुलै २०२०

१ जुलैला महावितरण ६ ठिकाणी वेबिनारच्या माध्यमातून साधणार संवाद

MSEB, Katemanivali - Electricity Suppliers in Thane, Mumbai - Justdial
नागपूर(खबरबात):

वीज ग्राहकांच्या देयकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी महावितरणच्या नागपूर शहर उपविभागात येणाऱ्या विविध उपविभागात उद्या दिनांक २ जुलै पासून वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. २ जुलै रोजी ६ ठिकाणी वेबिनारच्या माध्यमातून वीज ग्राहकांशी संवाद साधल्या जाणार आहे.

गांधीबाग विभागात येणाऱ्या वर्धमान नगर उपविभागातील वीज ग्राहकांसाठी दुपारी २ ते ३ या वेळेत इतवारी आणि बिनाकी उपविभागात दुपारी ४ ते ५ या वेळेत वीज ग्राहकांच्या तक्रारींचे वेबिनारच्या माध्यमातून निराकरण केल्या जाईल.अशी माहिती कार्यकारी अभियंता राहुल जीवतोडे यांनी दिली. मानेवाडा उपविभागातील वीज ग्राहकांसाठी २ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस नगर विभागातील रिजंट उपविभागात सकाळी ११ ते १२ आणि शंकर नगर उपविभागात वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. वीज ग्राहकांनी महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर केवळ ग्राहक क्रमांक नमूद करून वीजबिलाची सविस्तर आकारणी तपासून आपले देयक योग्य असल्याची पडताळणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.