डोंगरगाव प्रकल्प पुनर्वसीत आदिम कोलामांना अन्नधान्याची मदत kolam vikas Foundation - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०५ जुलै २०२०

डोंगरगाव प्रकल्प पुनर्वसीत आदिम कोलामांना अन्नधान्याची मदत kolam vikas Foundation
राजुरा / प्रतिनिधी
तालुक्यातील डोंगरगाव प्रकल्पालगत आदिम कोलाम व गोंड समुदायांचे पुनर्वसन केलेले अतिशय बिकट अवस्थेतील पिपरगाव नावाची वस्ती आहे. या वस्तीवर सोयी-सुविधांचा कमालीचा अभाव आहे. तळहातावर जिवन जगणा-या इथल्या आदिम समुदायालाही लाकडाऊनचा फटका बसला. कोलाम सहाय्यता अभियानाच्या दहाव्या चरणात पिपरगाव या आदिम जमातीच्या वस्तीतील कुटूंबांना काल (दि. 04) मदत पोहोचविण्यात आली.

कुणीतरी आपल्या पाठीशी उभे असल्याचा आशावाद येथील आदिवासी लोकांमध्ये निर्माण झाला व त्यांच्या चेह-यावर आनंदाचे स्मित उमटले. पिपरगाव प्रमाणेच जिवती तालुक्यातील चिखली व वणी कोलामगुडा येथिल आदिम कोलामांनाही मदत पुरविण्यात आली. यासह कोलाम सहाय्यता अभियानात मदत पुरविण्यात आलेल्या एकुण कुटूंबांची संख्या एक हजार चारशे पंच्याऐंशी झाली आहे. या चरणात राजुरा तालुक्यातील हरदोना येथील गुरुदेव सेवा मंडळ, शेतकरी संघटना व पाथ फाऊंडेशनने सहकार्य केले. शनिवार, दिनांक 04 जुलै 20 ला *कोलाम सहाय्यता अभियानांतर्गत* शंभर आदिम कुटूंबांना खाद्यसामुग्रीची मदत पोहोचविण्यात आली. यावेळी माजी आमदार अँड. वामनराव चटप, कोलाम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे, पत्रकार देवनाथ गंडाटे, पाथ फाऊंडेशनचे संचालक अँड दिपक चटप यांची प्रमुख उपस्थिती होती. कोलाम सहाय्यता अभियानात आतापर्यंत 1,358 कुटूंबांपर्यंत खाद्य सामुग्री पुरविण्यात आली आहे. यात सिमेवरील अतिदुर्गम व अत्यंत कठीण परिस्थीतीत वास्तव्य करून गुजराण करणा-या आदिम कुटूंबांचा समावेश आहे. या अभियानाला शेतकरी संघटना, नाम फाऊंडेशन, डोनेटकार्ट, पाथ फाऊंडेशन यासारख्या नामांकित संस्थासह अनेक स्थानिक संस्थांनीही हातभार लावला आहे. अनेक दानशूर दात्यांनी या अभियानाला सहकार्य केले आहेत. येत्या 11 जुलै रोजी समारोपीय कार्यक्रम होईल