हैदराबादच्या बिस्किट फॅक्टरीतील तिघे पॉझिटीव्ह - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

११ जुलै २०२०

हैदराबादच्या बिस्किट फॅक्टरीतील तिघे पॉझिटीव्ह


चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यंत 94 जण
कोरोना आजारातून झाले बरे
आतापर्यंतची बाधित संख्या 169 ;
Ø  उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 75
Ø  जिल्ह्यात  22 कंटेनमेंट झोन कार्यरत
चंद्रपूर,दि.11 जुलै: जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या एकीकडे वाढत असताना दिलासादायक बातमी म्हणजे आतापर्यंत 94 बाधित कोरोना आजारातून बरे झाले आहेत. 75 बाधितावर सध्या उपचार सुरू असून या सर्वांची प्रकृती देखील ठीक आहे. आत्तापर्यंत बाधिताची संख्या 169 झाली आहे.
सध्या उपचार सुरु असणाऱ्या 75 बाधितांपैकी चारहे जिल्ह्याबाहेरील रुग्ण असून राज्य राखीव पोलीस दलाचे जवान आहे. काल शुक्रवारी एकाच दिवशी 12 बाधित पुढे आले होते. यामध्ये लग्नामध्ये सहभागी झालेल्या 5 जणांचा समावेश होता. आज शनिवारी एकाच दिवशी 7 पॉझिटिव्ह पुढे आले असून यापैकी तीन जण हैदराबाद येथील एका बिस्कीट फॅक्टरीमध्ये कार्यरत होते.
हैदराबाद येथून प्रवासाची नोंद असलेल्या बाधितांमध्ये मूल तालुक्यातील गडीसुर्ला येथील 20 व 30 वर्षीय युवकांचा समावेश आहे. यांच्या सोबतीला चंद्रपूर येथील बगल खिडकी परिसरातील 24 वर्षीय युवक आहे. हे तीनही युवक  8 जुलैला हैदराबाद वरून आले आहेत. या युवकांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. हे तिघे देखील यापूर्वीच्या गडीसुर्ला येथील पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कातील होते. एकाच फ्लॅटमध्ये राहणारे हे सर्वजण पॉझिटिव्ह आले आहे. 10 तारखेला यांचे स्वॅब घेण्यात आले होते.
याशिवाय गृह अलगीकरणात असणारा ताडाळी येथील 30 वर्षीय पुरुषसंस्थात्मक अलगीकरणात असणारी ऊर्जानगर येथील 24 वर्षीय महिलासंस्थात्मक अलगीकरणात असणारा घुग्घुस येथील 14 वर्षीय मुलगा आणि चिमूर तालुक्यातील नेरी येथील 45 वर्षीय नागरिकांचा समावेश आहे. या सर्वांची बाहेरून प्रवास केल्याची नोंद आहे. बिस्किट कंपनीत काम करणारे वरील तिघे आणि वेगवेगळ्या शहरातून प्रवासाच्या नोंदी असणारे अन्य चार असे मिळून आज एकूण सात जण पॉझिटिव्ह म्हणून पुढे आले आहे.
आत्तापर्यंत 94 नागरिकांना कोरोना आजारातून बरे झाल्याचे जाहीर करण्यात आले असून 75 बाधितांवर उपचार सुरू आहे.यापैकी 72 बाधित कोविड केअर सेंटरवन अकादमी चंद्रपूर तर, 3 बाधित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे भरती करण्यात आलेले आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
सध्या 22 कंटेनमेंट झोन कार्यरत:
जिल्ह्यात एकूण 55 कंटेनमेंट झोन कार्यान्वित करण्यात आलेले आहे.यापैकी, 33 कंटेनमेंट झोन 14 दिवस पूर्ण झाल्यामुळे बंद करण्यात आलेले आहेत. 22 कंटेनमेंट झोन सध्या कार्यरत आहे.
कोविड-19 संक्रमित 169 बाधितांची चंद्रपूर जिल्ह्यात इतर राज्यातूनजिल्ह्यातूनरेडझोन मधून प्रवास केल्यामुळे बाधितांची संख्या वाढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील देशनिहायराज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. साऊथ आफ्रिका एककजाकिस्तान एक,  दिल्ली -8, हरियाणा (गुडगाव) दोनओडीसा एकतेलंगाना दोनगुजरात चारहैद्राबाद-21, नागपूर 6, अकोला दोनवाशिम एकमुंबई-16, ठाणे पाचपुणे-10, नाशिक चारजळगांव एकयवतमाळ -6, औरंगाबाद चारकोल्हापूर एकश्रीनगर एकपटना एकप्रवासाचा कोणताही इतिहास नसलेले-9, संपर्कातील व्यक्ती -62 आहेत.
तालुकानिहाय बाधितांची संख्या:
ग्रामीण भागामध्ये तालुका चंद्रपूर-19, बल्लारपूर तीनपोंभूर्णा तीनसिंदेवाही दोनमुल 8, ब्रह्मपुरी 27, नागभीड चारवरोरा 7, कोरपना तीनगोंडपिपरी एकचिमूर दोनभद्रावती एक बाधित आहे. शहरी भागामध्ये बल्लारपूर पाचवरोरा 14, राजुरा तीनमुल एकभद्रावती 9, ब्रह्मपुरी-14, कोरपणानागभिड प्रत्येकी एक तर गडचांदूर चार बाधित आहेत. तर चंद्रपूर महानगरपालिका भागामध्ये कृष्णनगर दोनबिनबा गेट एकबाबुपेठ चारबालाजी वार्ड दोनभिवापूर वार्ड दोनशास्त्रीनगर  एकसुमित्रानगर चारस्नेह नगर एकलुंबीनी नगर 4, जोडदेउळ एकतुकूम तलाव दोनदूध डेअरी तुकूम दोनलालपेठ एकपोलीस मंगल कार्यालय तुकूम चारदाद महल वार्ड एकशिवाजी नगर तुकुम एकइंदिरानगर तुकुम एकलालपेठ एकभानापेठ एकबगल खिडकी एक बाधित आहेत. असे एकूण बाधितांची संख्या 169 वर गेली आहे.
आतापर्यंतचे कोरोना बाधीतांचे विवरण :
चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधित ), 13 मे ( एक बाधित), 20 मे ( एकूण 10 बाधित ), 23 मे ( एकूण 7 बाधित), 24 मे ( एकूण 2 बाधित), 25 मे ( एक बाधित ), 31 मे ( एक बाधित ), 2 जून (एक बाधित), 4 जून (दोन बाधित), 5 जून ( एक बाधित),6 जून ( एक बाधित), 7 जून ( 11 बाधित),9 जून (एकुण 3 बाधित), 10 जून ( एक बाधित), 13 जून ( एक बाधित), 14 जून ( एकुण तीन बाधित),15 जून (एक बाधित), 16 जून ( एकुण 5 बाधित), 17 जून ( एक बाधित), 18 जून ( एक बाधित), 21 जून (एक बाधित), 22 जून (एक बाधित), 23 जून (एकूण बाधित चार ), 24 जून (एक बाधित), 25 जून (एकूण 10 बाधित),26 जून (एकूण दोन बाधित), 27 जून (एकूण 7 बाधित), 28 जून (एकूण 6 बाधित), 29 जून (एकूण 8 बाधित), 30 जून (एक बाधित), 1 जूलै (एकूण दोन बाधित), 2 जुलै ( 4 बाधित ), 3 जुलै ( एकूण 11 बाधित ), 4 जुलै ( एकूण 5 बाधित ), 5 जुलै ( एकूण 3 ‌ बाधित ), 6 जुलै ( एकूण सात बाधित ), 8 जुलै ( एकूण पाच बाधित ), 9 जुलै ( एकूण 14 बाधित ), 10 जुलै ( एकूण 12 बाधित ) आणि 11 जुलै ( एकूण 7 बाधित ) अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधित 169 झाले आहेत. आतापर्यत 94 बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 169 पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता 75 झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.