चनाखा व चुनाळा येथील शेतकऱ्यांच्या आत्महत्येस बॅंक व फायनान्स कंपनी जबाबदार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२२ जुलै २०२०

चनाखा व चुनाळा येथील शेतकऱ्यांच्या आत्महत्येस बॅंक व फायनान्स कंपनी जबाबदार
जिल्हाधिकारी यांचे सोबत विविध विषयावर हंसराज अहीर यांची चर्चा

परस्पर पिक कर्ज पूनर्गठीत केलेल्या बॅंकांवर कार्यवाहीची मागणीचंद्रपूर:-  ज्या ज्या बॅंकांनी शेतकऱ्यांच्या सहमती शिवाय कर्ज पूनर्गठीत केल्याने शेतकरी कर्जमाफीपासुन वंचीत राहीले अशा बॅंकांवर कायदेशीर कार्यवाही करून पूनर्गठन रद्द करून कर्जमाफीचा संबंधीत शेतकऱ्यांना लाभ होईल अशी कार्यवाही करण्याच्याही सुचना अहीर यांनी जिल्हाधिकारी यांना केल्या. राजुरा तालुक्यातील चुनाळा येथील शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने परस्पर कर्ज पूनर्गठीत केल्याने, तसे आदेशच काढल्याने पूनर्गठीत कर्जापायी व चनाखा येथील शेतकऱ्याला महिंद्रा फायनान्स कंपलीने शेत गहान ठेऊन वारंवार तगादा लावल्याने या आत्महत्या झाल्या असुन या दोन्ही प्रकरणी कायदेशीर सल्ला घेऊन फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. वेकोली बल्लारशा क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबीत काही प्रश्नाबाबत आपल्या अधिकारात येत असलेल्या प्रकरणी क्षेत्रीय महाप्रबंधक बल्लारपूर यांना सुचना देऊन प्रकल्पग्रस्त व आदिवासी अतिेक्रमण धारकांचे प्रश्न मार्गी लावण्याबाबत सदर बैठकीत अहीर यांनी चर्चा केली.

चंद्रपूर जिल्ह्यात कोवीड-19 या आजाराची वाढती रूग्ण संख्येमुळे प्रशासनामार्फत संस्थात्मक क्वारंटाईन केल्या जात आहे. क्वारंटाईन सेंटरवर क्वारंटाईन केलेल्या प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या शौचालयाची सुविधा देण्याची आग्रही सुचना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत जिल्हाधिकारी यांना केल्या. एकत्र शौचालय असल्याचा दुश्परिणाम झाला असावा त्यामुळे संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये कोवीड पाॅझीटीव रूग्णांची संख्या वाढली असावी अशी आशंका त्यांनी यावेळी व्यक्त केली त्याचबरोबर जिल्ह्यात एकही रूग्ण दगावला नाही या यशाबद्दल जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मच्याऱ्यांचे अभिनंदन केले. युरीया वितरणाबाबत लक्ष घालुन नियोजनाबाबत सुचना केल्या, शेतकऱ्यांमध्ये असलेल्या असंतोषाची दखल घेण्याचेही त्यांनी यावेळेस सांगीतले.