परसोडी रैय्यत येथील शेतकरी आसाराम मोहुर्ले यांचा विज पडून मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२१ जुलै २०२०

परसोडी रैय्यत येथील शेतकरी आसाराम मोहुर्ले यांचा विज पडून मृत्यू


संजीव बडोले
नवेगांवबांध दि.21 जुलै:-गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मौजा परसोडी रैय्यत येथील शेतकरी आसाराम कोदन मोहुर्ले वय 45 वर्ष यांचा विज पडून आज दिनांक 21 जुलै रोज मंगळवारला 4.30 वाजे दरम्यान मृत्यु झाला . शेतकरी आसाराम मोहुर्ले यांचे वडीलोपार्जीत २ एकर शेत असुन आजच त्यांनी रोवणीला सुरुवात केली.अत्यंत आनंददायी वातावरणात शेतातील रोवणी सुरु असतांनी, दुपार नंतर 4.30 वाजे दरम्यान विजांच्या कडाक्यासह पावसाला सुरुवात झाली . यावेळी आसाराम आपले बांध्यांचे पारी मारण्याचे कामात व्यस्त होते. मात्र नियतीने डाव साधला आणि विजेच्या कडाक्याने आसाराम आपले बांधावरच बेहोश होवून पडले, ते कायमचेच.आसारामच्या अंगावर वीज पडून जखमी झाला. नवेगाव बांध ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान 4.30 वाजता निधन झाले.
आसारामचे परिवारात म्हातारीआई, अंजना , पत्नी चेतना, टींकल व हेमराज ही दोन मुलं आहेत. या अचानक घडलेल्या नैसर्गिक आपदेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, आसाराम आपले परिवारातील कर्ता पुरुष असल्याने त्यांचे परिवारावर दु खाचे डोंगर कोसळले आहे. शेतकरी परिवाराला शासकीय आर्थिक मदत करण्यात यावी असी मागणी केली जात आहे.नवेगावबांध पोलिसांनी ग्रामीण रूग्णालयाच्या कक्ष सेवक जोत्सना जुगनाके यांच्या फिर्यादी वरून मर्ग क्रं.10/2020 सीआरपीसी 174 अन्वये आकस्मिक मृत्यू ची नोंद केली आहे.