आविसकडून मृतक गंगुलु येदासुला कुटुंबाला आर्थिक मदत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२७ जुलै २०२०

आविसकडून मृतक गंगुलु येदासुला कुटुंबाला आर्थिक मदत
किशोर खेवले 
सिरोंचा /प्रतिनिधी
सिरोंचा तालुक्यातील अमरावती येथील मृतक गंगुलू येदासुला यांच्या कुटुंबाला अविस कडून आर्थिक मदत करण्यात आले आहे.
मृतक गंगुलु यांचे अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर संकट आली असून घराच्या मुख्य व्यक्तीचा मृत्यू झाल्याने कुटुंब आर्थिक संकटात पडले. ही बाब आदिवासी विध्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम याना कळताच वेळेचा विलंब न करता अमरावती येथील मृतक गंगुलु यांचे घरी भेट देऊन त्यांचे कुटुंबाचा सांत्वन करून अविस कडून आर्थिक मदत करण्यात आले आहे.
सिरोंचा तालुक्यात कोणत्याही सामाजिक कार्यात सहभागी राहून अनेक गरजू लोकांना अनेक मदत करण्यात अविसचे बानय्या जनगाम पुढे राहतात. यावेळी अमरावती येथील अविसचे लक्ष्मण बोले, मलाय्या येदासुला, किस्टस्वामी येदासुला, लक्ष्मीस्वामी बीरेल्ली, किष्ठस्वामी बोलेसह गावकरी उपस्थित होते