मानवटकर रुग्णालय आता डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२९ जुलै २०२०

मानवटकर रुग्णालय आता डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल


कोरोना बाधितांना मिळणार
जन आरोग्य योजनेतून लाभ
चंद्रपूर दि. 29 जुलै: जिल्ह्यात कोवीड-19 अंतर्गत डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून मानवटकर  रुग्णालय, चंद्रपुरला मान्यता देण्यात आली आहे. या रुग्णालयामार्फत एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तथा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कोरोना बाधितांना लाभ मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी यांनी मानवटकर रुग्णालयाला दिलेल्या आदेशान्वये ऑगस्ट पासून कोरोना बाधित रुग्णास भरती करून एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तथा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कोरोना आजाराकरिता मोफत लाभ देण्यात येणार आहे. डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल असल्याने रुग्णालयात इतर रुग्णास भरती करण्यात येणार नाही, जनतेने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.