राष्ट्रवादीचे गटनेते, माजी नगराध्यक्षांचा कोरोनाने मृत्यू #corona #death - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१९ जुलै २०२०

राष्ट्रवादीचे गटनेते, माजी नगराध्यक्षांचा कोरोनाने मृत्यू #corona #death
जुन्नर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते दिनेश दुबे (वय५८) यांचे आज पहाटे कोरानामुळे पुणे येथे खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान निधन झाले.

दिनेश दुबे यांच्या निधनामुळे जुन्नर शहर व परिसरात शोककळा पसरली आहे.

काही दिवसापूर्वी दिनेश दुबे यांना कोरोनाची लागण झाल्याने पुणे येथे खाजगी दवाखान्यात उपचारासाठी हलविले होते.
माजी आमदार वल्लभशेठ बेनके ,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ,कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील ,राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते विश्वासू सहकारी होते.

जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी दिनेश दुबे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. मनाला चटका लावणारी ही घटना असून राष्ट्रवादी पक्षाचे व समाजाचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे. पक्षाचा एक लढवय्या नेता हरपला. मी त्यांच्याप्रती आदरांजली व्यक्त करतो.
दिनेश दुबे यांच्या निधनाबद्दल जुन्नर शहर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.