शिक्षकांचे पहिले ऑनलाईन अधिवेशन; राज्यातील पहिला उपक्रम - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२० जुलै २०२०

शिक्षकांचे पहिले ऑनलाईन अधिवेशन; राज्यातील पहिला उपक्रम

डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदनागपुर- डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या १० व्या राष्ट्रव्यापी आँनलाईन शैक्षणिक परिषदेचा आज समारोप झाला असून शिक्षकांचे पहिले आँनलाईन अधिवेशन घेणारी राज्यातील पहिली संघटना ठरण्याचा मान डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेला मिळाला आहे.
दिनाक ११ जुलै २०२० ते १८ जुलै २०२० पर्यंत डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने १० राष्ट्रव्यापी आँनलाईन शैक्षणिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.या परिषदेत देशातील शिक्षण क्षेत्रातील विविध विचारवंतांनी कोरोना च्या संकटात अडकलेल्या शिक्षण क्षेत्रातील विविध आव्हानांवर आपले विचार मांडले.डॉ.प्रशांत गावंडे , डॉ.प्रवीण दरक ,अँड गणेश हलकारे, प्रा.प्रशांत डवरे,प्रा.प्रविण देशमुख ,प्रतिभाताई भराडे ,विठ्ठल भुसारे,प्रा.लीलाधर पाटील, अँड वैशाली डोळस ,प्रा अलकाताई लुंगे ,आ.दत्तात्रय सावंत.अमृत साळूके ह्या विचारवंतांनी सतत आठ दिवस राज्यातील शिक्षकांचे प्रबोधन करून त्यांना कोरोनाच्या ह्या संकटात शिक्षण प्रक्रिया सतत सुरु ठेवण्यासाठी मार्गदर्शन केले. सदरील १० व्या राष्ट्रव्यापी आँनलाईन शैक्षणिक परिषदेचा राज्यातील जवळपास दीड लाख शिक्षक ,पालक व विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून सदरील शैक्षणिक परिषद देशाच्या शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक ठरेल असा विश्वास आयोजक व संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पप्पू पाटील भोयर , प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण नेव्हल , नागपूर विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर,महासचिव सुनिल चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
शिक्षक ,पालक व विध्यार्थ्यासाठी वैचारिक पर्वणी ठरलेल्या सदरील १० व्या राष्ट्रव्यापी आँनलाईन शैक्षणिक परिषदेचा आज समारोप झाला . परिषद यशस्वी करण्यासाठी डाँ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष पप्पू पाटील भोयर ,प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण नेव्हल ,महासचिव सुनिल चव्हाण,कार्याध्यक्ष दयानंद जाधव,कोषाध्यक्ष प्रभाकर पराड, शांताराम जळते,सतिष काळे,प्रा.शेषराव येलेकर,अंबादास रेडे,डाँ.विलास पाटील,राजकिरण चव्हाण ,संजय निंबाळकर, नागपुर विभागीय अध्यक्ष हर्षा वाघमारे, नंदा वाळके ,विनोद चिकटे, गौरव शिंदे,गजानन कोंगरे प्रवीण मेश्राम,मेघराज गवखरे,संगीता ठाकरे,स्वप्नील ठाकरे,राजेश मालापुरे,विजय कांबळे,चेतना कांबळे,सुरज बमनोटे, सुरेंद्र बनसिंगे,संजीव शिंदे,योगेश कडू,शामराव लवांडे,अजित पाटील,वसंत नेरकर,राजेंद्र भोयर,शालिक बोरसे,बंडू डाखरे,प्रल्हाद कर्हाळे,देवेंद्र टाले,ज्ञानेश्वर गायकवाड ,प्रेमचंद आहिरराव,आर.आर.वांडेकर,के.डी.वाघ,विठ्ठल घायाळ,अनंत मिटकरी,भास्कर शिंदे,पंजाब दांदले, संजय निंबाळकर शिवशंकर स्वामी,नितीन पवार,संगिता निंबाळकर,यांनी केले आहे .