महागाव येथील युवकाने, महिलेला गंभीर जखमी करून केली आत्महत्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०२ जुलै २०२०

महागाव येथील युवकाने, महिलेला गंभीर जखमी करून केली आत्महत्या

परिसरात खळबळ,दोघेही महागाव येथील
प्रेम संबधातून प्रकार झाल्याची चर्चा

संजीव बडोले/ प्रतिनिधी, नवेगावबांध
नवेगावबांध दि.2 जुलै:- गडचिरोली जिल्ह्यातील वडसा परिसरात युवक फाशी लागून असल्याची बातमी आली,त्यांनतर गडचिरोली जिल्ह्यातील वडसा तालुक्याच्या कोकडी येथे एक महिलेची धारधार शस्त्राने गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली असून फासावर लटकलेला युवक व ती महिला गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव/ सिरोली येथील असल्याचे समजताच दोन्ही जिल्ह्यात एकच खळबळ माजली.
गंभीर जखमी असलेली महिला व गळफास घेतलेला युवक हा अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव सिरोली येथीलच असून प्रेम संबधातुन झाल्याची चर्चा नागरिकांध्ये सुरू आहे.
घराच्या पाठीमागे घर असलेल्या महिलेवर त्याचे प्रेम जळले हे दोघेही घरून निघून गेले,कोरोना संसर्गजन्य परिस्थिती मध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आले दरम्यान काळात ते दोघेही घरी परत आले तो आपल्या स्वगावी महागाव येथे तर ती महिला आपल्या माहेरी कोकडी येथे गेली,परत सदर युवक पुन्हा कोकडी येथे गेला दरम्यानच्या काळात दोघात काही तरी घडले त्यावरून त्या युवकाने धारदार शस्त्राने दोन दिवसांआधी गंभीर जखमी केले त्या महिलेवर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते,त्या युवकांने स्वतः वडसा येथील अंडर ग्राउंड ब्रिज परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. उमेश श्‍यामराव जांभूळकर, (वय 28, रा. महागाव, शिरोली) असे मृताचे नाव आहे.
  प्रेम प्रकरणातून त्या महिलेला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची चर्चा आहे. पुढील तपास देसाईगंज पोलीस करीत आहें.