भाजपचं नेमकं काय सुरू आहे?? - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२१ जुलै २०२०

भाजपचं नेमकं काय सुरू आहे??

🔶️विशेष लेख

भाजपचं नेमकं सुरू काय आहे??

कोरोनाने दहा लाखाचा आकडा पार केलाय. लोक मरत आहेत. कोरोना अधिक वेगाने वाढतोय. तुम्ही म्हणाले, २१ दिवस द्या ते देऊन झाले. कोरोना मात्र गेला नाही. भारतात तो घट्ट पाय रोवून उभा दिसतोय, पण या कोरोना ने आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणाने देशाच्या अर्थव्यवस्थेच्या चिंधड्या केल्या आहे. कोरोना हाताळण्यात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी झाले आहे. त्याच खापर पूर्णपणे राज्यसरकारवर फोडून केंद्र सरकार नामानिराळे झाले आहे.

कोरोनाने लोक मरत आहे. पण भाजप सरकार पूर्णपणे सत्तेच्या नशेत आहे. भारताच्या विकासाचा संबंध यांच्या सत्तापिपासू वृत्तीत आहे का?? लोकशाही प्रक्रियेने सरकार स्थापन झाले असताना विधायकांची खरेदी करून सरकारे पडण्याचा प्रयत्न करायचा. ऐन कोरोनाची चाहूल असतांना मध्यप्रदेश च सरकार भाजपने पाडून ऑपरेशन लोटस करून भाजपने हे दाखवून दिलं आहे की लोक मेले तरी चालतील पण आमची सत्ता कायम राहिली पाहिजे, अशा सरकारला सामान्य माणसाची कुठलीही फिकीर नाही.

हे बेफिर लोक आहेत, आजही कुठल्या राज्याची सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजप कडे पैसे आहेत, पण मागच्या सहा वर्षात केंद्र सरकारने एकही सरकारी शाळेची इमारत किंवा एकही दवाखान्याची इमारत बांधलेली नाही. जे केंद्र सरकार आत्मनिर्भच्या गप्पा हाणत आहे त्या सरकारला लोकांचं आरोग्य आणि देशाची शिक्षा याची काहीही काळजी पडलेली नाही.

२०१३-२०१४ या काळात ३४४१६ एवढे हॉस्पिटल होते ते सहा वर्षात म्हणजे २०२० पर्यंत ३७५२५ झालीत म्हणजे जवळ जवळ १५००हॉस्पिटल या काळात वाढले पण यातील सर्वच केवळ खाजगी हॉस्पिटलस आहेत. ज्यातून भरमसाठ पैसा कमावला जातो, म्हणजे गरीब माणसाच्या आरोग्यासाठी सरकार नेमकं करत तरी काय आहे??

एकही सरकारी हॉस्पिटलची इमारत या सहा वर्षात उभी राहिली नाहीयेय. तर मग देशाच्या आरोग्य व्यवस्थेचे हाल कसे असेल?? याची कल्पना या कोविड च्या काळात न केलेली बरी. आणि त्यासोबतच गरीबाच्या मुलाचं शिक्षण याचा तरी हे सरकार काय विचार करत आहे?? कारण एकही सरकारी शाळेची इमारत या सरकारने गेल्या सहा वर्षात बांधलेली च नाही,म्हणजे शिक्षण आणि आरोग्य जे देशाच्या पायाभरणीत महत्वाचे घटक आहेत त्याबाबतीत तर सरकार उदासीन आहे पण सरकारे तोडण्यात आणि आमदारांची खरेदी विक्री करण्यात मात्र फारच गंभीर.

म्हणजे भाजपचा उद्देश केवळ सत्ता आणि सत्ता हाच आहे लोक मरत असेल तरी त्यांच्या प्रेतांवरून भाजपला सत्ता काबीज करायची आहे.ही कोणती लोकशाही भाजप चालवतोय?? युनो मध्ये भाषण करतांना शौचालय किती बांधले हे सांगताना अवघा चार तासाचा अवधी देऊन जो लॉक डाऊन लागू केला त्यामुळे मेलेले मजूर , हुकूमशाही पद्धतीने नोटबंदी लागू करून रांगेत मेलेले लोक या बाबत पंतप्रधानांनी कधी तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर संवेदना व्यक्त केल्या का??

इकडे २५००० लोक कोविड नि मरण पावलेत तर तिकडे भाजप केंद्र सरकारने सहा वर्षात काय केलं याचा हिशोब मांडत फिरत आहे. आपलं सरकार लोकांसाठी हे भाजप विसरली का?? या सहा वर्षात काय केलं या पुस्तकात एकही सरकारी हॉस्पिटलची इमारत बांधली नाही, एकही सरकारी शाळा बांधली नाही, एवढी बेरोजगारी वाढली याचा उल्लेख का नाही??

ते कलम ३५६ आणि सर्जिकल स्ट्राईक आणि आता होऊ घालेलेलं रॅम मंदीर या पलीकडे या देशातील माणूस कोरना मुळे दोन वेळच्या जेवणाला मोहताज झाला आहे या संबंधी कोणती माहिती तुमच्या या प्रोग्रेसिव्ह पुस्तकात आहे?? याची माहिती भाजपच्या एका तरी मंत्र्याने द्यावी?

कोविड मुळे सगळं बरबाद होत असताना एका सरकारी हॉस्पिटलच्या उभारणी पेक्षा अशा बिकट परिस्थितीत मंदिर तेवढं महत्वाचं का मानलं जातं आहे? आणि त्यासाठी पंतप्रधानाना बोलवलं आहे ते जाणार का?? यावर एकाही वाहिनीवर तासभर चर्चा का केल्या जात नाहीयेय?? प्रश्न फारच बिकट आहे, सत्तेसाठी मंदिर बांधू नका आणि आस्थेसाठी बांधायचं आहे तर थोडा वेळ घ्या.

हा भयाण काळ जाऊ द्या नाहीतर ज्या पद्धतीने या सरकारची कारकीर्द सुरू आहे.त्यावरून रोमच्या त्या राजाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही की, रोम जळत होत आणि निरो राजा फिडेल वाजवत बसला होता, आणि त्याची राणी ब्रेड मिळत नाही तर केक खा म्हणत होती. तूर्तास एवढंच...

🔳▪️ नम्रता आचार्य -ठेमस्कर