धक्कादायक:चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांना जीवे मारण्याची धमकी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२१ जुलै २०२०

धक्कादायक:चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांना जीवे मारण्याची धमकी

चंद्रपूर(खबरबात):
अवैध दारू विक्रेत्यांनी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांना निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी दिल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या कार्यालयात आज पोस्टाने हे पत्र मिळाले आहे.
आम्हाला दारू विकू द्या. आमच्या पोटावर पाय मारू नका. अन्यथा आपल्या जीवावर बेतेल अशी धमकी निनावी पत्राद्वारे आमदार किशोर जोरगेवार यांना मिळाली. या पत्रासंदर्भात जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार व पोलिस अधिक्षक डाँ महेश्वर रेड्डी यांना कळविले आहे.आमच्या सारख्या बेरोजगार लोकांच्या पोटावर पाय मारणे बरोबर नाही. आपली अवैध दारूसंदर्भात  भूमिका चुकीची आहे.


 आपण वारंवार एसपी साहेबांना भेटता. त्यामुळे दारूविक्रेते त्रस्त झाले आहे. यात आम्हा गरिबांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आमच्या सारख्या बेरोजगारांच्या पोटावर लाथ मारू नका. अन्यथा आपण किंवा आपल्या परिवारातील सदस्याची जीवित हानी झाल्यास तुम्ही स्वता जबाबदार असाल, अशी धमकीच पत्रातून दिली.यासंदर्भात किशोर जोरगेवार यांनी अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही. असे खडसावून सांगितले आहे.