धक्कदायक:वाडीत ४ नवे कोरोना बाधीत:एकुण कोरोना बाधितांची संख्या पोहचली ४३ वर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२९ जुलै २०२०

धक्कदायक:वाडीत ४ नवे कोरोना बाधीत:एकुण कोरोना बाधितांची संख्या पोहचली ४३ वर

नागपूर/ अरूण कराळे (खबरबात):
वाडीत दिवसेंदिवस कोरोनाबाधीतांची संख्या वाढत असुन कोरोनाचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही . बुधवार २९ जूलै रोजी डॉ. आंबेडकर नगर मधील भाऊ ,बहीण असे दोन कोरोनाबाधीत, हरिओम सोसायटी येथील एक २९ वर्षाचा युवक कोरोनाबाधीत आढळला तर दौलतवाडी येथील ३९ वर्षाच्या युवक कोरोना बाधित असल्याची माहिती वाडी नगर परिषद आरोग्य निरीक्षक धनंजय गोतमारे यांनी दिली. 

त्यामुळे चार कोरोनाबाधीतांची भर पडल्यामुळे आजपर्यंत एकुण ४३ कोरोनाबाधीताची संख्या झाली आहे.नवीन चार कोरोना बाधितांची तपासणी खाजगी लॅब मधून केली असल्याची माहिती आहे. कोरोना बाधित आढळून आलेल्या रुग्णाचे परिसर सील करण्यात आले आहे .सर्वांना उपचाराकरिता नागपूरला पाठविण्यात आल्याची माहीती वैद्यकीय अधिकारी डॉ. सुषमा धुर्वे ,आशा पर्यवेक्षक वृंदा रंगारी यांनी दिली .संर्पकात येणाऱ्या नागरीकांनी स्वतःहून पुढे यावे असे आवाहन मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी केले आहे.