डिफेन्स मध्ये ऑर्डनन्स फॅक्टरी सेवानिवृत्त कर्मचारी पहीला कोरोनाबाधीत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२५ जुलै २०२०

डिफेन्स मध्ये ऑर्डनन्स फॅक्टरी सेवानिवृत्त कर्मचारी पहीला कोरोनाबाधीत

वाडीत चार कोरोना बाधीत एकुण संख्या २९ 
डिफेन्स मध्ये पोहोचला कोरोना 
नागपूर / अरूण कराळे (खबरबात)
डिफेन्स मध्ये कोरोना पोहोचल्याने डिफेन्स वसाहती मधील लोकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. 
डिफेन्स येथील ऑर्डन्स फॅक्टरी मधील सेवानिवृत्त ६० वर्षीय कर्मचार्‍याची प्रकृती बरी नसल्याने त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली तेव्हा ते कोरोना बाधीत आढळले .
वाडी नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या आंबेडकर नगर येथील विलगीकरणात असलेल्यापैकी चार जण कोरोना बाधित आले असल्याने वाडीत कोरोना बधितांची संख्या २९ वर गेली आहे.
ऑर्डन्स फॅक्टरी वसाहती मधील सेक्टर नंबर ५ मध्ये कोरोना बाधित राहत असलेला परिसर ग्रामपंचायत सोनेगाव यांनी सील केला असताना ऑर्डनन्स फॅक्टरीच्या अधिकाऱ्याने सील उघडून त्या भागात राहणाऱ्या कर्मचार्‍यांना काम करण्यास सांगितले.
संबंधित क्षेत्रात बाजार,साई मंदिर जिथे दर गुरुवारी एकत्रितपणे पूजा केली जाते.या बाबींकडे ऑर्डिनेन्स फॅक्टरी प्रशासनाचेही याकडे दुर्लक्ष केले आहे.परिसराची जिल्हा परिषद शिक्षण सभापती भारती पाटील,वैद्यकीय अधिकारी डॉ. सुषमा धुर्वे यांनी पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या.यावेळी उपसरपंच सतीस डुकरे,सदस्य राकेश साखरे,राजू मोहोड,कमलाकर इंगळे, सुधीर गवई,मालती इंगळे,संगीता काळे, सुनीता मोहोड उपस्थित होते.