'लिटमस टेस्ट' मध्ये नागपूरकर पास...! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२७ जुलै २०२०

'लिटमस टेस्ट' मध्ये नागपूरकर पास...!महापौर संदीप जोशी : उद्यापासून लोकप्रतिनिधी करणार जनजागृती

नागपूरदि. २६ : नागपूरकारांच्या एकजुटीला सलाम करतो. जीवनपद्धती बदलण्यासाठी आणि कोरोनासंदर्भात असलेले दिशानिर्देश पाळण्यासाठी महानगरपालिकेने 'जनता कर्फ्यू'चे आवाहन केले. त्याला नागपूरकरांनी दिलेला प्रतिसाद उत्स्फूर्त असून संकटाविरोधात नागरिकांनी दाखविलेल्या एकजुटीला मी सलाम करतो. पुन्हा लॉकडाऊन लागू नये म्हणून ही 'लिटमस टेस्टहोती. यात नागपूरकर पास झालेत. मी नागपूरकर असल्याचा मला अभिमान आहेया शब्दात महापौर संदीप जोशी यांनी नागपूरकर कोरोनाविरोधात लढत असलेल्या लढाईचा गौरव केला.

महापौर संदीप जोशी यांनी आज जनता कर्फ्यूला मिळत असलेल्या प्रतिसादाची पाहणी करण्यासाठी त्रिमूर्ती नगरप्रताप नगरनरेंद्र नगरमानेवाडादिघोरीकेडीके कॉलेजजगनाडे चौकनंदनवनहसनबागभांडे प्लॉटसक्करदरा परिसरात दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत उपमहापौर मनिषा कोठे, स्थायी समितीचे सभापती विजय (पिंटू) झलके होते. या भागातील संपूर्ण दुकाने बंद होती.  जे नागरिक रस्त्यावर होते त्यांना घरी राहण्याचे आवाहन केले. ज्यांच्याजवळ मास्क नव्हतेत्यांना मास्कचे वाटप केले.

याप्रसंगी बोलताना महापौर संदीप जोशी म्हणालेलॉकडाऊन होऊ नयेयासाठी नागपूरकरांना आपल्या सवयींमध्ये बदल करावा लागेल. मास्कचा वापरशारीरिक अंतराचे पालनसॅनिटायझरचा वेळोवेळी वापर या सवयी अंगीकाराव्या लागेल. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. नागपूरकरांनी ठरवले तर हे अशक्य नाहीहे नागपूरकरांनी दोन दिवसात दाखवून दिले. लॉकडाऊन हा अंतिम पर्याय नाहीहे आता नागपूरकरांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे पुढील चार दिवस अशाच पद्धतीने आपली जीवनशैली करण्याचा प्रयत्न नागपूरकरांनी करावाअसे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले.

पुढील चार दिवस जनजागृती

दोन दिवस 'जनता कर्फ्यूयशस्वी केल्यानंतर आता नागपुरातील सर्व खासदारआमदारमनपा पदाधिकारी आणि नगरसेवक जनतेत जाऊन कोरोनासंदर्भातील नियम नागरिकांनी पाळावे यासाठी पुढील चार दिवस जनजागृती करणार आहेत. या चार दिवसानंतर नागपुरात लॉकडाऊन करायचे की नाहीहे ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे कडक पालन करावेअसे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.