वडधामना येथे घरफोडीत २ लाख ७० हजाराचा ऐवज लुटला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१५ जुलै २०२०

वडधामना येथे घरफोडीत २ लाख ७० हजाराचा ऐवज लुटला

नागपूर / अरूण कराळे (खबरबात):

नागपूर तालुक्यातील पोलीस स्टेशन वाडी अंतर्गत येणाऱ्या वडधामना येथे संचारबंदी शिथिल होताच अज्ञात चोरटयांनी घरफोडी करून अंदाजे अडीच लाख रुपयांचे सोने व २० हजार रुपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

प्राप्त पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार वडधामना जुनी वस्ती येथील रहिवासी केशवराव भेंडे आपल्या परिवारासह शेतात असलेल्या घरात राहतात सोमवार १३ जुलै रोजी घरातील सर्व सदस्य गाढ झोपेत असतांना मंगळवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास चोरट्यानी घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपाट नेले . ते कपाट घरापासून काही अंतरावर असलेल्या शेताच्या बाहेर नेऊन तोडून कपाटातील अडीच तोडे सोनं व पँटच्या खिशात ठेवलेले नगदी २० हजार रुपये लंपास केले.

सकाळी विनायक भेंडे गाईचे दूध काढायला उठले असता घरी चोरी झाल्याचा प्रकार लक्षात येताच पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र पाठक यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा संकपाल पुढील तपास करीत आहे.