लेखी आश्वासनानंतर पत्रकारांचे उपोषण तात्पुरते स्थगित:गटविकास अधिकारी नंदागवळी दिर्घरजेवर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०९ जुलै २०२०

लेखी आश्वासनानंतर पत्रकारांचे उपोषण तात्पुरते स्थगित:गटविकास अधिकारी नंदागवळी दिर्घरजेवर

समुद्रपूरचे सहाय्यक गटविकास अधिकारी 
देशमुख यांनी स्वीकारला पदभार 
कारंजा (घाडगे):
जिल्हा परिषद प्रशासन व जिल्हा परिषद अध्यक्षा यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले,  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, आमदार  दादाराव केचे,आमदार रामदासजी आंबटकर, तसेच जिल्हा परिषदेचे पंचायत विभागाचे सहाय्यक गटविकास अधिकारी एस, पी, पडघन यांची यावेळी उपस्थिती होती, येथील पंचायत समितीचे वादग्रस्त  गटविकास अधिकारी नंदागवळी यांच्या अनागोंदी कारभारा बाबत स्थानिक पत्रकारांनी बातम्यांच्या माध्यमातून याला वाचा फोडली होती, 
पण पत्रकारांविरुद्ध येथील बीडीओ ने खंडणीची खोटी तक्रार देत धमक्या दिल्या होत्या त्यामुळे स्थानिक पत्रकार व नागरिकांनी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती, न्याय न मिळाल्याने 15 जून रोजी येथील पंचायत समिती समोर एक दिवसाचे उपोषण करण्यात आले,यावेळी आमदार दादाराव केचे व जिल्हापरिषद अध्यक्ष सरिता गाखरे यांनी भेट देत कारवाई चे आश्वासन दिल्याने उपोषण  
  तातपुरते स्थगित करण्यात आले होते, 
पण अखेर बेदखल झालेल्या प्रशासनाला पुन्हा निवेदन देऊन इशारा देण्यात आला, पण निगरगट्ट प्रशासनाला अखेर जाग न आल्याने नाईलाजास्तव  पुन्हा  दुसऱ्यांदा 3 जुलै पासून मुंडन आंदोलन करत उपोषण करण्यात आले ,अखेर पत्रकार व स्थानिक नागरिकांचा वाढत  असलेला तणाव पाहून दि, 8 बुधवार ला जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे यांनी स्वतःतर्फ पत्र देऊन व जिल्हा परिषद कडून पंचायत विभागाचे सहाययक गटविकास अधिकारी एस, पी, पडघन यांनी वेगवेगळे  पत्र देऊन कारवाईचे आश्वासन दिले,त्यामुळे हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले, यावेळी आमदार दादाराव केचे, आमदार रामदासजी आंबटकर,व जिल्हापरिषद अध्यक्ष सरिता गाखरे यांनी उपोषणाला बसलेले गजानन बाजारे, जगदीश कुरडा,संजय नागापूरे यांनी निंबू  पाणीपाजून उपोषण सोडले, 
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मुकुंदराव बारंगे,जिल्हा उपाध्यक्ष शिरीष भांगे,नगरसेवक संजय कदम,पंचायत समितीचे उपसभापती जगदीश डोळे यांची उपस्थिती होती,येथील पंचायत समितीचे बीडीओ नंदागवळी हे दिर्घरजेवर गेल्याने समुद्रपूर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी प्रवीण देशमुख यांनी पदभार स्वीकारला