शेळीपालन,कुक्कुटपालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२९ जुलै २०२०

शेळीपालन,कुक्कुटपालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण


युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन
चंद्रपूर(खबरबात):
  महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारे 7 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक-युवतींकरिता 5 ऑगस्ट 2020 ते 17 ऑगस्ट 2020 रोजी 14 दिवस (दोन आठवडे) कालावधीचे पशुधनावर आधारित शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. तरी बेरोजगार युवक-युवतींनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणामध्ये शेडची रचना, व्यवसायाचे फायदे, शेळी, गाय व कोंबड्यांच्या विविध जाती, पैदास, निवड, प्रजनन, औषधोपचार, लसीकरण, निगा व संरक्षण प्रतिबंधक उपाय त्यांचे संगोपन व व्यवस्थापन, संतुलित आहार, जीवनसत्वाचे महत्व, संसर्गजन्य रोग व त्यावरील उपचार तसेच शासनाच्या विविध अनुदानित योजना, उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन, कर्ज प्रकरण तयार करण्याचे मार्गदर्शन, पशुधन विकास कार्यालयाच्या योजना व्यवसाय संधी इत्यादी विषयावर तज्ञ मार्गदर्शक व शासकीय अधिकारी वर्गाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
प्रशिक्षणात प्रवेश घेण्याकरिता इच्छुक युवक-युवतींनी दि. 4 ऑगस्ट 2020 रोजी स्वतःचा बायोडाटा, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, आधार कार्ड व दोन पासपोर्ट साईज फोटो इत्यादी कागदपत्रांसह महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, उद्योग भवन, दुसरा माळा, गाळा क्र. 208 बस स्टॉप समोर, रेल्वे स्टेशन रोड, चंद्रपुर येथे उपस्थित रहावे. तसेच अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के. व्ही.राठोड (मो.क्र.9403078773, 07172-274416), कार्यक्रम आयोजिका लक्ष्मी खोब्रागडे (मो.क्र.9309574045) यांच्याशी संपर्क साधावा.