अचानक वीज कडाडल्यानंतर चंद्रपुरातील अनेक घरचे फॅन,टीव्ही,फ्रिज,बंद:आधीच लॉकडाऊन त्यात आणखी एका आर्थिक फटक्याची भर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२९ जुलै २०२०

अचानक वीज कडाडल्यानंतर चंद्रपुरातील अनेक घरचे फॅन,टीव्ही,फ्रिज,बंद:आधीच लॉकडाऊन त्यात आणखी एका आर्थिक फटक्याची भर

Top 50 TV Repair Services in Thanjavur - Best TV Repairs - Justdial
संग्रहित
चंद्रपूर(खबरबात):
मंगळवारी अचानक सुरु झालेल्या मुसळधार पावसाने अनेकांची झोप उडवली. हो त्याचे कारणही तसेच आहे, चंद्रपूर शहरात मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. बघता बघता पावसाने आपला जोर वाढवला अश्यातच अचानक मोठ्याने वीज कडाडली.आणि सलग कडाडणाऱ्या या विजेने शेकडो घरातील विद्युत उपकरणे बंद पडली. 

 अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि पाऊस सुरू असतानाच अचानक वीज आणि ढग गडगडू लागले अशातच चार ते पाच वेळा मोठ्याने वीज कडाडून शहरातील भिवापूर वॉर्ड परिसरातील शेकडो घरातील विद्युत उपकरणे बंद पडली. 
अनेकांच्या घरचे फॅन,टीव्ही,फ्रिज यासह अन्य विद्युत उपकरणे निकामी झाली. टीव्ही सेटअप बॉक्स देखील उडाल्याने बुधवारी सकाळी  भिवापुर वॉर्ड परिसरातील सर्वांच्या घरचे सेट-टॉप-बॉक्स देखील केबल ऑपरेटर कडून जमा करण्यात आले. तर  काहींच्या घरचे मीटरचे  वायर आपोआप जडल्याचे निदर्शनात आले.  आधी लॉकडाऊन त्यात आणखी एका आर्थिक फटक्याची भर पडल्याने परिसरातील अनेकांना या घटनेमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.