चंद्रपूर:पोलिसांच्या रहिवासी इमारतीत क्वारंटाईन सेंटर;अलगीकरण सेंटर वसाहतीत नको;पोलीस परिवारांची दबक्या आवाजात चर्चा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०७ जुलै २०२०

चंद्रपूर:पोलिसांच्या रहिवासी इमारतीत क्वारंटाईन सेंटर;अलगीकरण सेंटर वसाहतीत नको;पोलीस परिवारांची दबक्या आवाजात चर्चा


ललित लांजेवार(खबरबात):
राज्यासह चंद्रपूर शहरातील व जिल्ह्यात देखील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अशातच चंद्रपुरात सोमवारी रात्री उशिरा ७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली.  त्यात ३ राज्य राखीव पोलिस दलाचे जवान आहेत. 

या जवानांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येताच  जिल्हा प्रशासनाने तातडीच्या उपाययोजना करत या तीनही एसआरपीएफच्या जवानांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेत त्यांना क्वारंटाईन केले. मात्र त्यासाठी पोलिसांच्याच रहीवासी वसाहतीत संशयितांना अलगीकरण करून ठेवल्याने या रहिवासी बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या पोलीस परिवारात झगडे सुरु झाले असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  

शहरातील गिरनार चौक परिसरात वैनगंगा आणि पैनगंगा अश्या २ पोलीस वसाहती आहेत, यात अनेक पोलिसांचे परिवार देखील राहतात. SRPF चे ३ जवान कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांना याच इमारतीतील काही फ्लॅट्समध्ये अलगीकरण प्रक्रियेत ठेवण्यात आले . हे कोरोना(अलगीकरण) सेंटर रहिवासी इमारतीत नको असे पोलिस परिवारात दबक्या आवाजात चर्चा असून पोलीस परिवाराची चिंता आणि धडधड वाढू लागली आहे. 
  या दोन्ही इमारतीत क्वारंटाईन सेंटर सुरू झाल्याने आता या इमारतीतील विविध मजल्यावर राहणाऱ्या पोलीस परिवारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे,काही पोलिसांच्या बायका आता पोलिसांन मागे टोचणी लावून राहिलेले आहेत  हे कोरोना सेंटर आम्हालाही धोकादायक ठरू शकतं अशी भीती पोलीस परिवारात आहे. मात्र शिस्तीसाठी असणारे पोलीस तक्रार करणार तरी कुठे? असा प्रश्न आता पोलिसांना पडला आहे.त्यामुळे आता वरिष्ठ या क्वारंटाईन सेंटरला आणखी कुठे शिफ्ट करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.