बायकोसोबतच्या वादानंतर त्याने ९ महिन्याच्या मुलीला ड्रममधील पाण्यात बुडवून मारले ठार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१६ जुलै २०२०

बायकोसोबतच्या वादानंतर त्याने ९ महिन्याच्या मुलीला ड्रममधील पाण्यात बुडवून मारले ठार

नागपूर(खबरबात):
दुपारी नवराबायकोचं वाद होतो थोड्याच वेळात या वादाचे रूपांतर इतक्या भयावह पद्धतीने होणार याची कल्पना हि कोणी करू शकत नाही अशी काहीशी घटना नागपुरात घडली. कौटुंबिक कलहातून नऊ महिन्यांच्या चिमुकलीची ड्रममधील पाण्यात बुडवून ठार करत स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला. 

ही थरारक घटना गुरुवारी दुपारी भांडे प्लॉटमधील शंकर साई मठ परिसरात उघडकीस आली. या घटनेने रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. अल्विना सोनू शेख, असे मृताचे नाव आहे. सोनू वय ३० हा जखमी असून, त्याच्यावर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.तो खासगी वाहनावर चालक आहे, घटनेची माहिती सक्करदरा पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. 

पोलिसांनी जखमी सोनू याला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ड्रममधून अल्विनाचा मृतदेह बाहेर काढला. पंचनामा करून मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील शवागाराकडे रवाना केला. याप्रकरणी सक्करदरा पोलिसांनी खुनाचा व आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.