देवकीबाई बंग विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचा १००टक्के निकाल - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२० जुलै २०२०

देवकीबाई बंग विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचा १००टक्के निकाल

मागील १० वर्षा पासून १००टक्के निकाल
 देणारी तालुक्‍यातील एकमेव शाळा
नागपूर / अरूण कराळे (खबरबात ):
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे बारावीचा निकाल जाहिर करण्यात आला त्यात स्थानिक देवकीबाई बंग विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचा १००% निकाल लागला असून एच एस सी परीक्षेत १००% निकाल देण्याची मागील दहा वर्षांपासूनची परंपरा यावर्षी सुद्धा शाळेने कायम ठेवली. 

वाणिज्य विभागात तरन्नुम अन्सारी हिने (९१.५३%)गुण घेऊन तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला तर सानिया गणवीर (९१.०७%) निखिल नंदनवार (९०.६१%)गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान प्राप्त केले.तसेच अश्विनी राऊत (८९.०७%)कलश शहा (८८.९२%) श्वेता उके (८७.३८%)घेऊन गुणवत्ता यादीत आल्या.विज्ञान विभागात हर्षल दुर्गे(८४.४६%)गुण घेऊन विद्यालयातून प्रथम आला तर प्रग्या झा या विद्यार्थीनीने द्वितीय स्थान मिळविले.

उल्लेखनीय बाब म्हणजे विद्यालयातील वाणिज्य विभागातून सहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शाळेच्या पेचात मानाचा तुरा रोवला. 

गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री रमेशचंद्र बंग संचालक महेश बंग, अरुणा बंग, प्राचार्य नितीन तुपेकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय विद्यालयाचे प्राचार्य नितीन तुपेकर, पर्यावेक्षक अतुल कटरे. विभाग प्रमुख विनोद वानखेडे, आराधना घरडे, रोशन बनकर, प्रियंका देवतळे, कविता यादव, पूजा त्रीपाठी, श्वेता तुपेकर, सलमान पठाण, स्वप्नील राऊत, शैलेश भगत आधी शिक्षक व पालकांना दिले.