वाडीत भाजपाने चीनचा निषेध करुन शहीदांना वाहली श्रध्दांजली - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१९ जून २०२०

वाडीत भाजपाने चीनचा निषेध करुन शहीदांना वाहली श्रध्दांजली

नागपूर / अरुण कराळे (खबरबात):
येथील भारतीय जनता पक्षातर्फे लदाखच्या गलवान खोऱ्यात चीनने केलेला भ्याड कृत्याचा निषेध करुन शहीद भारतीय जवानांना श्नद्धांजंली अर्पण केली . सर्वप्रथम भारतमातेची पुजा करून चीननिर्मीत वस्तुची होळी करुन चीनचा निषेध केला . भारतीय हद्दीत सुरक्षा चौकी उभारण्यास चीनच्या सैनिकांना जाब विचारणाऱ्या भारतीय सैनिकांवर चीनच्या सैन्याने सोमवारी मध्यरात्री भ्याड हल्ला केला . यात वीस भारतीय जवान शहीद झाले . चीनच्या या आगळीकीमुळे आम्हाला दुःख झाल्याचे श्रद्धांजली वाहतांना स्पष्ट केले . चीनी मालावर बहीष्कार घालण्याचे व भारतीय वस्तु वापरण्याचे आवाहन केले .

यावेळी भाजपा वाडी शहर अध्यक्ष केशव बांदरे,भाजपा वाडी मंडळ उपाध्यक्ष कमल कनोजे ,माजी नगरसेवक कैलाश मंथापुरवार,आनंदबाबु कदम, राजेश जिरापूरे ,मनिष गाडे , भाजपा ट्रान्सपोर्ट आघाडीचे मानसींग ठाकूर , महीला आघाडी जिल्हा महामंत्री राजुताई(जनक) भोले,माजी सभापती कल्पना सगदेव, उर्मीला चौरसीया , इशांत राऊत ,राजेंन्द्र बिसेन,सुरेश लिमकर,बापू लिमकर , रवि कामनापुरे, अक्षय तिडके,शंकर कडु, जयंत वैद्य उपस्थित होते.