शिवभोजन थाळीचा गरजवंतानी लाभ घ्यावा:खासदार कृपाल तुमाने - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०३ जून २०२०

शिवभोजन थाळीचा गरजवंतानी लाभ घ्यावा:खासदार कृपाल तुमाने

वाडीत शिवसेनेच्या अथक प्रयत्नाने शिवभोजन थालीचे उदघाटन 
दररोज पाच रुपयात मिळणार जेवन 
नागपूर/अरुण कराळे (खबरबात):
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान दिलेल्या वचननाम्यानुसार राज्यातील सामान्य गोरगरीब,कामगार,शेतमजूर,शेतकरी यांना १० रुपयात जेवण देणाऱ्या आश्वासनाची पूर्तता हिवाळी अधिवेशनात केल्याने नवीन वर्षात प्रायोगिक तत्त्वावर राज्यात ५० ठिकाणी शिव भोजन थाळी योजना सुरू केली होती .

परंतू कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे इतर ठिकाणी शिवभोजन थाळी सुरू झाली नव्हती . खरी आजची गरज ओळखुन गोदामनगरीत प्रथमच शिवभोजन थाळी सुरू झाल्यामुळे येथील होतकरू कामगार वर्गाला दिलासा मिळणार आहे असे प्रतिपादन खासदार कृपाल तुमाने यांनी व्यक्त केले.
येथील आशा हॉस्पीटल अँन्ड रिसर्ज सेंटरच्या बाजूला असलेल्या मोहीत भोजनालयात शुक्रवार २९ मे रोजी खासदार कृपाल तुमाने यांच्या हस्ते तहसीलदार मोहन टिकले ,मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले ,वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक ,युवासेना जिल्हाप्रमुख हर्षल काकडे, शिवसेना हिंगणा विधानसभा संघटक संतोष केचे ,तालुका प्रमुख संजय अनासाने ,उपतालुका प्रमुख रुपेश झाडे ,शहर प्रमुख प्रा. मधु माणके पाटील ,युवासेना हिंगणा विधानसभा संघटन प्रमुख विजय मिश्रा ,जिल्हा सरचिटणीस कपील भलमे ,तालुका प्रमख अखिल पोहणकर यांच्या उपस्थितीत शिवभोजन थाळी भोजन केद्रांचे उदघाटन करण्यात आले. शासनाच्या नियमानुसार दररोज ९० थाळी चे वाटप पाच रुपये प्रमाणे करायचे आहे . 
परंतू चिननिर्मीत कोरोना विषाणूमुळे नागरीक त्रस्त झाले आहेत.गरीब कामगार वर्गाच्या जेवनाचे वांदे झाले आहे त्यामुळे कोणताही नागरीक उपाशी राहु नये या करीता सर्व गरजवंताच्या जेवनाची सोय लागावी या उद्देशाने कितीही गरजवंत जेवण करण्यासाठी आले तरीही त्यांना आम्ही पाच रुपये मध्ये जेवण देणार आहोत.त्यांचा खर्च शिवसेना युवासेना करणार आहे त्यामुळे गरजवंतानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रास्ताविकतेतून बोलतांना जिल्हाप्रमुख हर्षल काकडे यांनी केले .
यावेळी प्रा. पुरुषोत्तम कोठे,राकेश अग्रवाल ,पीके मोहनन , सचिन बोंबले ,विलास भोंगळे , प्रफुल भलमे , पंकज कौंडण्य ,मोहित कोठे,पिंटू पोहनकर,रंजीत सोनसरे,संदीप विधळे, अखिलेशसिंग, क्रांतिसिंग,लोकेश जगताप,अमीत चौधरी , राहूल ठाकरे ,मोनिका राऊत ,केसरी बोरडकर , योगीता नवखरे प्रामुख्याने उपस्थित होते.