मानव हा वसुंधरेचा विश्वस्त आहे सरीता यादव शिवशक्तीनगर मध्ये वृक्षारोपण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०७ जून २०२०

मानव हा वसुंधरेचा विश्वस्त आहे सरीता यादव शिवशक्तीनगर मध्ये वृक्षारोपण

नागपूर/ अरूण कराळे (खबरबात)
संपूर्ण जग कोरोना संकटाशी लढत असतांना पर्यावरण सरंक्षण व पर्यावरण संवर्धनाची गरज ठळकपणे जाणवत आहे .मानवी जीवनात निसर्गाचं जंगलांच वन्यप्राण्याचं महत्व आहे .मानव हा वसुंधरेचा विश्वस्त आहे . असे प्रतिपादन नगरसेवीका सरीता यादव यांनी केले .
वाडी, दत्तवाडीतील शिवशक्तीनगर मध्ये मंदीर कमेटी द्वारा श्री राम मंदीर परिसरात स्थानीक नगरसेविका सरीता यादव यांच्या पुढाकाराने पर्यावरण दिवस निमीत्य वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करून वृक्षारोपण केले . यावेळी त्या बोलत होत्या . यावेळी यावेळी रमेश सातपुते, गजानन गटलेवार, कृष्णाजी दानेज,प्रविण महल्ले, शाम भुरे,विनोद मिश्रा,प्रफुल कौरती , सुशिला सातपुते,गीता रागीट ,सौ. बाळपांडे सौ. लाखे, सौ. रागीट
उपास्थित होते .