छोटे व्यापारी व लघुउद्योगावर आले मोठे संकट शासनाने विशेष पॅकेज द्यावे:माजी मंत्री रमेशचंद्र बंग - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०४ जून २०२०

छोटे व्यापारी व लघुउद्योगावर आले मोठे संकट शासनाने विशेष पॅकेज द्यावे:माजी मंत्री रमेशचंद्र बंग

नागपूर/ अरूण कराळे (खबरबात):
राज्यातील छोटे व्यापारी व लागूउद्योगांवर कोरोना मुळे मोठे संकट निर्माण झाले असून यापुठे काय होईल या विचारात हा वर्ग असून यांना शासनाने थेट आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी केली.
अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावणारे छोटे व्यापारी व लघुउद्योग कोरोना संकटामुळे संकटात आहेत. मागील दोन महिन्यापासून कोरोना प्रादुर्भाव वाढू नये म्हूणन टाळेबंदी आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवांमद्ये येणाऱ्या व्यापार व्यतिरिक्त बाकी सर्व व्यापार बंद आहे. तर त्यावर अवलंबून असणारे लघुउद्योग सुद्धा बंद आहेत.
 पण व्यवसासाच्या जागेचे भाडे, लाईट बिल, बँकेचे कर्जाचे हप्ते हे सुरूच आहेत त्यामुळे हा वर्ग मोठया आर्थिक संकटात सापडलेला आहे. टाळेबंदी उठल्यावर सुद्धा व्यवसाय कसा सुरु करायचा त्यासाठी भांडवल कशे उभे करायचे अशे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे आहेत त्यामुळे शासनाने छोटे व्यापारी व लघुउद्योजक यांना थेट मदत जाहीर करावी अशे मत राज्याचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी व्यक्त केले.
यासाठी आपण राज्याचे मुख्यमंत्री, व उपमुख्यमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार करून सादर प्रश्न लावून धरणार असेही रमेशचंद्र बंग यांनी खबरबात शी बोलतांना सांगितले.