पर्यावरण दिनी कोसळला झाङ; युवक ठार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०५ जून २०२०

पर्यावरण दिनी कोसळला झाङ; युवक ठार

जुन्नरमध्ये वादळात अंगावर झाड कोसळल्याने युवकाचा मृत्यू
जुन्नर दि. ५ /आनंद कांबळे
झोपडीवर झाड कोसळल्याने जखमी झालेल्या जुन्नर येथील १६ वर्षीय युवकाचा मंचर येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अजय साहेबराव साळुंखे असे या युवकाचे नाव असुन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजुला झोपड्यात तो राहत होता.या ठिकाणी असलेले महाडुकाचे मोठे झाड दिनांक 3 रोजी झोपडीवर कोसळले होते. अजय याच्या डोक्यावर मार लागल्याने रक्तस्राव झाला होता . त्याला मंचर येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्याचा आज दिं ५ सकाळी उपचारादरम्यान मृत्यु झाला. अजयला आई-वडील नसुन त्याचे चुलतभावाने त्याचा सांभाळ केला होता.माजी खासदार शिवाजीराव आढळराव ,माजी आमदार शरद सोनवने यांनी मृत अजय याच्या घरी भेट देऊन आपत्तकालीन मदत मिळवुन देनार असल्याचे सांगितले.