मेहा बूज येथे दोन वाघाच्या हल्ल्यात 3 जनावरे ठार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

मेहा बूज येथे दोन वाघाच्या हल्ल्यात 3 जनावरे ठार

मेहा बूज येथे  दोन वाघाच्या हल्ल्यात 3 जनावरे ठार


सावली - तालुक्यातील मेहा बूज येथील शेतकऱ्यांची 3 जनावरे 
दोन वाघाच्या हल्ल्यात ठार झालीत. पाथरी वनपरिक्षेत्रात येणारे  मेहा हे गाव जंगलग्रस्त असून, गेल्या काही वर्षांपासून वाघाची दहशत आहे. 


गावातील जनावरे घेऊन गुराखी हा जंगलाशेजारी चराईसाठी गेला होता. या जनावरांच्या कळपावर दोन वाघांनी हल्ला केल्याने त्यात 3 जनावरे ठार झालेली असून 1 जखमी आहे. वाघांच्या या हल्ल्यामुळे जनावरे इतरत्र पळाली. सदर घटनेची माहिती मिळताच वन कर्मचारी घटनास्थळी गेले. या वाघांच्या हल्ल्यामध्ये मेहा बूज येथील सुरेश गंडाटे यांची म्हैस, प्रकाश कोलेते यांची गाय, राजेंद्र कोलते यांची गाय अशी 3 जनावरे ठार झाली. महेंद्र ठाकरे यांचा गोरा जखमी आहे . या घटनेची माहिती वनविकास महामंडळच्या पाथरी विभागाला देण्यात आली. सदर विभागातर्फे पंचनामा करण्यात येत आहे.