भरधाव चारचाकी वाहनाचा टायर फुटून भीषण अपघातात तिघेजण ठार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२२ जून २०२०

भरधाव चारचाकी वाहनाचा टायर फुटून भीषण अपघातात तिघेजण ठार


वरोरा तालुक्यातील मांगली शिवारातील घटना

वरोरा(शिरीष उगे): नागपूर-चंद्रपुर महामार्गावर नागपूरवरून चंद्रपूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहनाचा टायर फुटल्याने रस्ता दुभाजक ओलांडून दुसऱ्या मार्गावर वाहन जाऊन घडलेल्या अपघातात तिघेजण ठार झाल्याची घटना नागपूर -चंद्रपूर मार्गावरील वरोरा तालुक्यातील मांगली शिवारात आज, २१ जून रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. यात दोघेजण घटनास्थळीच ठार झाले तर एकाचा उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे नेताना मृत्यू झाला. एमएच ०२ सी. डब्ल्यू. ७३६१ या क्रमांकाच्या वाहनाने सिदेश पंढरीनाथ प्रभु साळगावकर (३६, रा. गडमने, ता. सावंतवाडी, जि. सिधुदुर्ग), सुनीलकुमार अग्रवाल (३५, रा. भरतपूर, राजस्थान हल्ली मुक्कमा दाताळा रोड चंद्रपूर), दशरथ बिपट्टे (३६) हे तिघेजण आज दुपारी नागपूर येथून चंद्रपूरकडे जात होते. दरम्यान, नागपूर -चंद्रपूर मार्गावरील वरोरा पोलस स्टेशन हद्दीतील मांगली शिवारात सदर वाहनाचा टायर फुटल्याने वाहन असंतुलीत होऊन दुभाजकावरून रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला जाऊन पलटले. या भीषण अपघतात दोनजण जागीच ठार तर एकजण उपचाराकरिता वरोरा येथे नेताना ठार झाला. यातील मृतक सुनीलकुमार अग्रवाल हा चंद्रपूर येथील धारीवाल कंपनीत कार्यरत असल्याची माहिती सूत्रांनी मिळाली आहे. घटनेचा पुढील तपास वरोरा पोलिस करीत आहेत.