भद्रावती येथे गळफास घेऊन आत्महत्या, दोन वेगवेगळ्या घटना - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१० जून २०२०

भद्रावती येथे गळफास घेऊन आत्महत्या, दोन वेगवेगळ्या घटना


भद्रावती (शिरीष उगे):
शहरातील गौतम नगर येथे विवाहितेची तर सुरक्षा नगर येथे वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या असून पोलिसांनी या घटनेने बाबत मर्ग दाखल केला आहेभाग्यश्री रुपेश रामटेके वय 24 वर्ष राहणार गौतम नगर भद्रावती असे गळफास घेऊन मृत झालेल्या विवाहितेचे नाव असून घटनेच्या काही दिवसापूर्वी तिच्या नवऱ्यासोबत घरगुती भांडण झाले होते यात ती गेल्या काही दिवसापासून एकमेकाशी बोलत नव्हते याच गोष्टीचा मनात राग धरून तिने रविवारच्या रात्रो दरम्यान छताला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली या घटनेची माहिती नवऱ्याला कडताच त्याने भद्रावती पोलिसांना माहिती दिली.तर दुसर्‍या घटनेत राम कृष्ण बापूराव डाहुले वय 70 वर्ष राहणार सुरक्षा नगर असे आत्महत्या करणाऱ्या वृद्धाचे नाव असून हा गेल्या काही वर्षापासूनआजारी होता वैद्यकीय उपचार करूनही प्रकृती ठिक होत नसल्याने त्याने आजाराला कंटाळून रविवारला घरासमोरील झाडाला साडीने गळफास बांधून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली या दोन्ही घटनेचा भद्रावती पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.