चंद्रपूर बल्लारपूर मार्गावर तांदूळ घेऊन जाणारा ट्रक झाला पलटी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

चंद्रपूर बल्लारपूर मार्गावर तांदूळ घेऊन जाणारा ट्रक झाला पलटी

सुदैवाने मोठी जीवितहानी टळली
चंद्रपूर/ प्रतिनिधी
बल्लारपूर मार्गावर तांदूळ घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. यात सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असून ट्रक चालकाला दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तांदूळ घेऊन जाणारा ट्रक हा चंद्रपूर शहरातून बल्लारपूर च्या दिशेने जात होता. मात्र बायपास मार्गावरील पेट्रोल पंप जवळ ट्रक अचानक पलटी झाला. यात सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी चालकाला मोठी दुखापत झाल्याची माहिती आहे. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाहतुक सुरळीत केली.