पेट्रोल पंपावर सुमारे दोन लक्ष किंमतीच्या डिझेलवर चोरट्यांचा डल्ला! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ जून २०२०

पेट्रोल पंपावर सुमारे दोन लक्ष किंमतीच्या डिझेलवर चोरट्यांचा डल्ला!

येवला तालुक्यातील गवंडगाव इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर सुमारे दोन लक्ष दहा हजार रुपये किंमतीच्या डिझेलवर अज्ञात चोरट्यांचा डल्ला!

येवला प्रतिनिधी/विजय खैरनार
येवला तालुक्यातील गवंडगांव येथील इंडियन ऑइल पेट्रोलियम कार्पोरेशनच्या सी,राज पेट्रोलियमच्या भूमिगत साठवण टाकीतून शनिवारी(दि.१३)च्या अज्ञात चोरट्यांनी वीज नसल्याने अंधाराचा फायदा घेत व सीसीटीव्ही कॅमेरा चुकवत मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दोन लाख दहा हजार रुपये किंमतीचे सुमारे तीन हजार लिटर डिझेल(इंधन) चोरी झाल्याची घटना घडली असून रविवारी (दि.१४) सदर घटनेची तक्रार सी राज पेट्रोलियम गवंडगांव(ता.येवला)
येथील मालक मोहम्मद सिराजुद्दीन सिद्दीकी यांनी येवला ग्रामीण पोलीस ठाण्यास दिली असून पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक
श्रीराम शिंदे यांनी सदर घटनेचा पंचनामा घटनास्थळी केला असून रात्री उशीरपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते दरम्यान याच प्रकारची घटना नांदगाव(वैजापूर)गवंडगांव पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या राधिका पेट्रोलियम पंपावर घडली असल्याची माहिती गवंडगांव पोलीस पाटील रामेश्वर अशोक भागवत यांनी दिली आहे यावर दोन्ही गुन्ह्यामध्ये
साम्य असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे