राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले विविध मागण्यांचे निवेदन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०३ जून २०२०

राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले विविध मागण्यांचे निवेदन


चंद्रपूर/खबरबात:
राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाच्या वतीने शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यात याव्या यासाठी जिल्हाधिकारी यांनी निवेदन देण्यात आले. २००५ नंतर शासकिय सेवेत रूुजू झालेल्या सर्व कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकांना बीएलओ च्या कामातून वगळण्यात यावे. जि.प. व न.प.च्या सर्व विद्याथ्र्यांना गणवेश देण्यात यावा. 

ओबीसी कर्मचाºयांना इतर संवर्गाप्रमाणे पदोन्नती देण्यात यावी, जि.प. अंतर्गत केंद्रप्रमुख सरळसेवेची भरती न करता पदोन्नतीने करण्यात यावी, जि.प. शाळांचे विजबिल ग्रामपंचायतीने भरावे अशी मागणी करण्यात आली. निवेदन देतांना महासंघाचे श्री रामराव हरडे, श्याम लेडे हे उपस्थित होते व प्रदीप पावडे, देवराव दिवसे, राजू हिवंज उपस्थित होते.