ग्रामपंचायतींना अतिरिक्त निधी द्या जि. प. सदस्य दिनेश बंग - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

ग्रामपंचायतींना अतिरिक्त निधी द्या जि. प. सदस्य दिनेश बंग
नागपूर / अरूण कराळे (खबरबात):
कोरोनामुळे ग्रामपंचायतींना आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे ग्रामपंचायतींना शासनाने अतिरिक्त निधी द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग यांनी जिल्हाधीकारी रवींद्र ठाकरे यांना निवेदन देऊन केली. 

कोरोनामुळे ग्रामपंचायतीला संपूर्ण गावात निर्जंतुकीकरण करणे, सॅनिटायझर, मास्क चे गावात वाटप करणे, स्वच्छतेवर अधिक भर देणे आदी कार्य करावे लागत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडत असून त्याने ग्रामपंचायतीचे बजेट कोलमडले आहे. कोरोना असल्यामुळे गावातील कर वसुली सुद्धा होत नाही, 

त्यामुळे ग्रामपंचायतींना आपत्ती व्यवस्थापन मधून अतिरिक्त निधी द्यावा अशी मागणी जिल्हापरिषद सदस्य दिनेश रमेशचंद्र बंग, जिल्हापरिषद सदस्य सुचिता विनोद ठाकरे यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना निवेदन देऊन केली.यावेळी विनोद ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.