वडधामना येथे मजुराच्या घराला आग - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२३ जून २०२०

वडधामना येथे मजुराच्या घराला आग

नागपूर/ अरूण कराळे (खबरबात):
वडधामना येथील वॉर्ड नंबर ५ मधील वस्ती भागात असलेल्या एका मजुराच्या घरी सोमवार २२ जुन रोजी सकाळी १०. ३० वाजता अचानक आग लागली.
या आगीच्या घटनेत घरातील साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने घरी कुणी नसल्याने प्राणहानी झाली नाही. आगीत दोन लाख ५० हजारांहून अधिकचे नुकसान झाले.रवींद्र उईके वय ३८ असे मोलमजुरी करणाऱ्याचे नाव असुन दोन मुले व पत्नी असे चार जण वास्तव्यास होते. पती मोलमजुरी करण्यासाठी सकाळीच घराच्या बाहेर पडले तर पत्नी अर्चना खाजगी कारखान्यात काम करण्यासाठी सकाळी १० वाजता गेली होती .
 मुले बाहेर गेली होती .कामाला जातांना सकाळी पुजापाठ करुन घरी दिवा लावला होता. दिव्यामुळे आग लागल्याचे बोलल्या जात आहे. पत्नीला बाजूच्या महीलेनी कारखान्यात फोन करून घर जळल्याची माहिती दिली पत्नी काम सोडून घरी परत आली असता संपूर्ण घर जळालेले अवस्थेत होते त्यात घरात असलेले पैसे ,धान्य, दिवाण, कपडे, आदीचा समावेश होता .आगीने तत्काळ विक्राळ रूप घेतले. 
आगीचे लोळ उठले. हा परिसर दाट लोकवस्तीचा असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते . वाडी नगरपरिषद अग्निशमन स्थानकाचे एक बंब घटनास्थळी दाखल झाले . तो पर्यंत स्थानीक नागरीक विलास काचोरे,मुकेश पाल यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली होती. ग्रामपंचायत सचिव हरिभाऊ लोहे,तलाठी विजय मर्जिवे घटना स्थळी पोहचून घटनेचा पंचनामा केला . हरिभाऊ लोहे यांनी उईके परिवाराला लगेच धान्य किट वितरित केली. वडधामना ग्रामपंचायत तर्फे आर्थीक मदत देण्याची घोषणा हरिभाऊ लोहे यांनी केली . घटनेच्या पंचनामाचा रिपोर्ट तहसिलदार यांना पाठविला आहे.