वीज समस्या सोडविण्यासाठी नवयुवक मंडळाचे निवेदन, दिला आंदोलन करण्याचा इशारा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१५ जून २०२०

वीज समस्या सोडविण्यासाठी नवयुवक मंडळाचे निवेदन, दिला आंदोलन करण्याचा इशारा
सिंदेवाही/ प्रतिनिधी
सिंदेवाही तालुक्यातील नांदगाव येथे नागरिकांना मागील काही दिवसांपासून विजेच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. हलका पाऊस किंवा थोडंफार वादळ आलं तरी येथील वीज खंडित होऊन वीज पूर्ववत होण्यासाठी 3-4 तास लागतात. यामुळे नांदगांव येथील नागरिक वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, गावातील दोन वार्ड मधील वीज पुरवठा नियमित सुरू असतो मात्र वार्ड क्र. 2 मध्ये वीज खंडित होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. यामुळे या समस्येकडे ग्रामपंचायत तसेच महावितरणचे लक्ष वेधून ही समस्या लवकरात लवकर सोडविण्यात यावी साठी नवयुवक मैंत्रेय मंडळतर्फे ग्रामपंचायतला निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, वर्ड क्र. 2 मधील वीज वारंवार खंडित होण्यामुळे येथील नागरिक त्रस्त आहेत. मागील एक वर्षपासून ही समस्या कायम आहे. कित्येकदा या संबंधी निवेदन देऊनही महावितरण मंडळाने लक्ष दिले नाही. यामुळे नागरिक महावितरण कार्यप्रणालीवर तीव्र रोष व्यक्त करत आहेत. ही समस्या लवकर सोडवण्यात यावी अशी मागणी नवयुवक मंडळातर्फे करण्यात आली आहे. सोबतच विजेची समस्या लवकर सोडविण्यात आली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा नवयुवक मंडळाने यावेळी दिला.
यावेळी नवयुवक मंडळाचे अध्यक्ष अमोल बोरकर, लीलाधर बोरकर, गणेश गुळधे, मंगेश लोखंडे, प्रशांत बोरकर, सुमित डोंगरवर, तुषार ननावरे, अमोल नागपुरे,अजय बोरकर इत्यादी सदस्य उपस्थित होते.

वारंवार पाठपुरावा करूनही महावितरणाचे दुर्लक्ष
गावातील ही समस्या दूर करण्यासाठी मागील एक वर्षांपासून सिदेवाही महावितरण कार्यलयात सहायक कनिष्ठ अभियंता याना निवेदन देण्यात येत आहे. मात्र सिंदेवाही महावितरण कार्यालय समस्येचे गांभीर्य लक्षात न घेता याकडे दुर्लक्ष करीत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात या समस्येमुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला. पावसाळ्यात ही समस्या आणखी वाढेल म्हणून वीजपुरवठा नियमित करून ही समस्या सोडविण्यात यावी यासाठी नव्याने 9 जून 2020 ला महावितरण कार्यालय सिंदेवाही येथील कनिष्ठ अभियंता याना निवेदन देण्यात आले आहे.
*सौ. अर्चना नन्नावरे, सरपंच ग्रामपंचायत नांदगांव*