चंद्रपुर:फूल लोडेड ट्रक MSEB च्या पोलला धड़क देत शिरला हॉटेलमध्ये - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ जून २०२०

चंद्रपुर:फूल लोडेड ट्रक MSEB च्या पोलला धड़क देत शिरला हॉटेलमध्ये

चंद्रपूर/खबरबात:
सोमवारी दुपारच्या सुमारास चंद्रपूर बल्लारपूर महामार्गावर अष्टभुजा मंदिर परिसरात जवळ एक फुललोड घेऊन जाणारा ट्रक महावितरणच्या विद्युत खांबांना धडक देत एका पान ठेल्यावर चढला. 

त्यात पानठेला चालकाचे व महावितरणची दोघांचेही नुकसान झालेले आहे. लॉकडाऊन संपत आल्याकारणाने मोठ्या आशेने उद्या आपली दुकान सुरू होईल अशी आशा ठेवत पानठेला चालकाने आपल्या पानठेलयात चहापान नाश्त्याचा सामान भरलं.  मात्र अगोदरच ट्रकने धडक दिल्याने त्याच्या ठेल्याचे मोठे नुकसान झाले.  यात फ्रीज कोल्ड्रिंक आणि अन्य वस्तूंचा समावेश आहे. 
या अपघातात महावितरणचे  देखील वीस ते पंचवीस हजाराचे नुकसान झाले असल्याची माहिती प्रभारी कार्यकारी अभियंता विजय चावरे यांनी दिली आहे.

विशेष म्हणजे ग्राहकांचा खंडित झालेला विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करण्यात आला व नंतर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.