एमपीएससी’परीक्षांचे वेळापत्रक जाहीर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

एमपीएससी’परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर रोजी

करोना विषाणु संसर्गामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्थगित केलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर होईल. वेळापत्रक जाहीर झाल्याने राज्यभरातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. करोना विषाणू संसर्गामुळे एमपीएससीने नियोजित परीक्षा स्थगित केल्या होत्या.