आष्टी ते पारडी गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील रेल्वे गेट सुरू करा:आ.समीर मेघे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१९ जून २०२०

आष्टी ते पारडी गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील रेल्वे गेट सुरू करा:आ.समीर मेघे

नागपूर/ अरूण कराळे (खबरबात):
नागपूर तालुक्यातील आष्टी ते पारडी या गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील रेल्वेगेट बंद केल्यामुळे या दोन गावात जाणारा रस्ताच बंद झाला आहे . दोन गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरून रेल्वे विभागाने पूल तयार केला परंतू त्या पुलाचे काम अर्धवट असल्यामुळे पाणी साचले आहे . त्यामुळे दोन गावातील रहदारी बंद झाली आहे .
 याचा विनाकारण त्रास लोकांना सहन करावा लागत आहे.पावसाळा संपेपर्यंत रेल्वे गेट सुरू करावे अशी मागणी आमदार समीर मेघे यांच्याकडे बोरगावचे सरपंच प्रफुल्ल ढोले यांनी केली . आमदार समीर मेघे यांनी तहसीलदार मोहन टिकले ,रेल प्रशासन विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री डोंगरे यांना घटनास्थळी बोलावून चर्चा घडवून आणली .
 यावेळी भाजपा वाडीमंडळ अध्यक्ष प्रमोद गमे ,उपसरपंच निलेश कोठाले ,विलास पुरी अविनाश तरवटकर भूषण बोरकुटे अमोल कुरळकर ,अंकित ठाकरे ,पवन तरवटकर ,प्रणय फुलझेले ,दिलीप पडोळे ,सुरेश पुंड प्रामुख्याने उपस्थित होते.