दादाजी खोब्रागडे यांना मरणोत्तर पद्म पुरस्कारासाठी राष्ट्रवादीची शिफारस - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१२ जून २०२०

दादाजी खोब्रागडे यांना मरणोत्तर पद्म पुरस्कारासाठी राष्ट्रवादीची शिफारस

दादाजी खोब्रागडे यांचा मरणोत्तर पद्म पुरस्काराने सन्मान व्हावा - जयंत पाटीलमुंबई दि. १२ जून - सुप्रसिद्ध कृषी संशोधक स्वर्गीय दादाजी खोब्रागडे यांना मरणोत्तर पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी राज्य सरकारने भारत सरकारकडे शिफारस करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.दादाजी रामाजी खोब्रागडे हे भाताच्या जास्त उत्पादन देणाऱ्या जाती शोधून काढणारे एक कृषी संशोधक होते. केवळ इयत्ता तिसरी पर्यंत शिकलेले खोब्रागडे एक अल्पभूधारक शेतकरी होते.१९८३ पासून त्यांनी तांदळाचे नवीन वाण बनवण्याच्या प्रयोगाला सुरूवात केली.सहा वर्षांच्या बीजगुणनाच्या प्रयोगानंतर ते नवीन वाण तयार करण्यात यशस्वी झाले.

स्वर्गीय दादाजी खोब्रागडे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संशोधन करून तांदळाचे नवीन नऊ वाण शोधले होते. या अत्यंत बुद्धिमान कृषी संशोधकाचे निधन अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत झाले. स्वर्गीय दादाजी खोब्रागडे यांचा योग्य सन्मान व्हायला हवा. म्हणून त्यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार देण्याची शिफारस महाराष्ट्र सरकारने केंद्रसरकारकडे करून या कृषीरत्नाचा योग्य सन्मान करावा असे जयंत पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.