वाडीत झाला कोरोनाचा प्रवेश; बाधित महिलेच्या घरी सुनेच्या पाळण्याचा कार्यक्रम - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२८ जून २०२०

वाडीत झाला कोरोनाचा प्रवेश; बाधित महिलेच्या घरी सुनेच्या पाळण्याचा कार्यक्रम

न. प .हद्दीतील पहिली महिला रुग्ण

नागपूर / अरूण कराळे (खबरबात)
चिननिर्मीत कोरोना विषाणूने मागील तीन महिन्यापासून नागपूर जिल्ह्यात सर्वत्र थैमान घातले असतांना वाडी नगर परिषद परिसर सुरक्षित असल्याने स्थानिकांनी सुटकेचा श्वास सोडला होता.परंतु अचानक शनिवार २७ जुन रोजी रात्री सुरक्षा नगर मधील ६० वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आल्याने शहरात एकच खळबळ उडून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाने तत्काळ कार्यवाही करीत बाधित महिला राहत असलेली गल्ली सील केली आहे.
प्राप्त माहितीनुसार ६० वर्षीय कोरोना बाधित महिला अस्थमा आजाराने पीडित असल्याने नागपूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार करीत होती.काही दिवसांपूर्वी उपचार घेण्यासाठी संबंधित हॉस्पिटलमध्ये गेली असता डॉक्टरांना तपासणी करताना कोरोना आजाराची काही लक्षणे असल्याची शंका येताच कोविड १९ ची तपासणी केली असता शनिवारी संबंधित चाचणीचा अहवाल पॉजिटीव्ह येताच त्याची तात्काळ माहिती नगर परिषद प्रशासन व आरोग्य विभागाला देताच शनिवारी रात्री ९. ३० च्या दरम्यान सुरक्षानगर येथे वाडी नगर परिषदचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले,उपमुख्याधिकारी आकाश साहरे,तालुका आरोग्यअधिकारी डॉ.सचिन हेमके,डॉ.रश्मी धुर्वे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक आपल्या सहकाऱ्यांसह पोहचुन बाधित महिलेला मेडिकल कॉलेज येथे दाखल केले तर परिवारातील सात सदस्यांना वनामती येथे क्वारंटाईन केले तथा संपूर्ण परिसर सील करून स्थानिक गल्लीतील रहिवाशांना होम क्वारंटाईन केले आहे.परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.


बाधित महिलेच्या घरी याच आठवड्यात लहान सुनेचा नवव्या महिन्याचा पाळण्याचा कार्यक्रम झाल्याची माहिती पुढे येत असून या कार्यक्रमात नातेवाईक व शेजाऱ्यासह ३० ते ४० लोक सहभागी झाल्याने त्या सर्वांची माहिती स्थानिक प्रशासन व जिल्हाआरोग्य विभाग घेत असून त्यांनाही क्वारंटाईन करून त्यांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली आहे.
सध्या वाडी शहरात स्थानिक नगर परिषद प्रशासन व आरोग्य विभागामार्फत घरोघरी जाऊन आरोग्या संबंधित माहिती गोळा करण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे त्यासाठी स्थानिकानी कर्मचाऱ्यांना सहकार्य करीत आरोग्यसंबंधीची खरी माहिती देण्याचे आव्हान मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी केले आहे.स्थानिक प्रशासनाने आता सक्तीचे पाऊल उचलत कडक कार्यवाही तसेच कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी स्थानिक प्रशासनाने थातूरमातूर उपाय योजना न करता तातडीची योग्य उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले.