चारगाव येथील पुलाची भिंत पहिल्याच पावसात खचली - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

चारगाव येथील पुलाची भिंत पहिल्याच पावसात खचली

चारगाव येथील पुलाची भिंत पहिल्याच पावसात खचली

सावली /प्रतिनिधी
तालुक्यातील चारगाव येथील तलावाच्या नहराच्या दुरुस्तीचा एप्रिल २०२० पासून सुरू झाला आणि आणि अद्याप काम सुरू आहे. काल दिनांक ११ एप्रिल ला रात्री पाऊस आल्याने पुलाची भिंत खचली. नंतर गावकऱ्यांनी कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. व कामात लोह्याचा वापर नसल्याचे दिसून आले व त्या पुलाचा काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्पष्ट झाले.
जंगलात रिंगदेव तलाव आहे. या तलावाच्या माध्यमातून चारगाव ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या चारगाव व भारपायली या दोन गावांतील शेताना पाणी पुरविल्या जाते. या दोन्ही गावातील १८१ हे.आर. जमीनक्षेत्र सिंचनाखाली आहे.
सिंचन विभागाचे अभियंता पुल्लावार यांच्यासोबत फोन वर संपर्क साधला असता त्यांनी मी दवाखान्यात भरती आहे, काम माझ्या समोर झालं आहे, माझ्या गैरहजेरीत काही कमी जास्त झालं असेल असं सांगितले. व फोन ठेवून दिला. ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीला पुलाची भिंत खचल्याने शेतकरी आहेत.
एवढे निकृष्ट दर्जाचे काम सुरू असूनही सिंचन विभाग कस काय दुर्लक्ष करू शकते? सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारासोबत हात मिळवणी केली असेल काय? हे प्रश्न गावकऱ्यांसमोर उपस्थित होत आहेत. आणि हे काम या महिन्यात पूर्ण न झाल्यास गावकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे.