कन्टोनमेंट झोन अरततोंडी, सिलेझरी येथे गाव समितीची सभा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

कन्टोनमेंट झोन अरततोंडी, सिलेझरी येथे गाव समितीची सभा

उपविभागीय अधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांची सभा


संजीव बडोले/नवेगावबांध
दिनांक 1 जून 2020
नवेगावबांध:-अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अरततोंडी दाभना व सिलेझरी येथील एक-एक मूळनिवासी कोरोना बाधित आढळल्यामुळे, दिनांक 29 मेला अरततोंडी व सिलेझरी हे गाव कन्टोनमेंट झोन म्हणून अर्जुनी मोरगावचे उपविभागीय अधिकारी तथा विभागीय दंडाधिकारी शिल्पा सोनाले यांनी घोषित केले होते. सदर दोन्ही व्यक्ती मुंबईवरून दिनांक 15 मेला स्व गावी अरततोंडी व सिलेझरी येथे आले होते. ते गोंदिया व गडचिरोली येथील कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आले असल्याचे कळल्याने, त्यांना अर्जुनी मोरगाव येथील कोविड केअर सेंटर मध्ये दिनांक 27 मेला भरती करण्यात आले होते. सदर दोन्ही व्यक्तीचा अहवाल दिनांक 28 मेला रात्री उशिरा प्राप्त झाला होता. सदर व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे सिद्ध झाले होते. कन्टोनमेंट झोन अरततोंडी/ दाभना व सिलेझरी या दोन्ही गावी आज दिनांक 1 जूनला गाव समितीची सभा घेण्यात आली. या सभेला शिल्पा सोनाले उपविभागीय अधिकारी, अर्जुनी मोरगाव, विनोद मेश्राम, तहसीलदार, मयुर  अंदेलवाड गट विकास अधिकारी, डॉ. विजय राऊत तालुका आरोग्य अधिकारी, तालुका कृषी अधिकारी  लांजेवार, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील, संचालक गोंदिया जिल्हा सहकारी बँक समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी सिलेझरी व अरततोंडी या दोन्ही गावी वेगवेगळ्या झालेल्या सभेत उपस्थित अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना कोरोना बाबत खबरदारी घेण्याचे व कन्टोनमेंट झोन मध्ये करावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.