डायनॅमिक जोडी: BMW F 900 R आणि BMW F 900 XR भारतात सादर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ जून २०२०

डायनॅमिक जोडी: BMW F 900 R आणि BMW F 900 XR भारतात सादरBMW F 900 R: अस्‍सल राइडिंग मौजमजेसाठी डायनॅमिक रोडस्‍टर.

BMW F 900 XR: लांबच्‍या अंतरापर्यंत स्‍पोर्टी परफॉर्मन्‍ससाठी डिझाइन करण्‍यात आलेली अॅडवेन्‍चर स्‍पोर्टस् टूरर.


BMW मोटोर्राड इंडियाने आज भारतामध्‍ये नवीन BMW F 900 R आणि नवीन BMW F 900 XR सादर केली. वर्षातील दोन बहुप्रतिक्षित मोटरसायकल्‍स BMW मोटोर्राड डिलर नेटवर्कच्‍या माध्‍यमातून कम्‍प्‍लीटली बिल्‍ट-अप युनिट्स (CBU) म्‍हणून उपलब्‍ध असतील.

डायनॅमिक, दर्जेदार व आकर्षक नवीन BMW F 900 R रोडस्‍टरमधून स्‍वातंत्र्य व आधुनिक जीवनशैलीची भावना दिसून येते. अॅडवेन्‍चर स्‍पोर्टस् टूरर नवीन BMW F 900 XR स्‍पोर्टीनेस व टूरिंग क्षमतांचे अतुलनीय संयोजन देते. दोन्‍ही नवीन बाइक्‍समध्‍ये स्‍पोर्टस्-स्‍टाइल डिझाइन व डायनॅमिक्‍सच्‍या परिपूर्ण संयोजनासोबत अचंबित करणारी कामगिरी समाविष्‍ट आहे.

BMW ग्रुप इंडियाचे अॅक्टिंग प्रेसिडण्‍ट मि. अरलिंदो टेक्‍सीरा म्‍हणाले, ''BMW मोटोर्राडने भारतामध्‍ये जगातील सर्वोत्तम प्रि‍मिअम मोटरसायकल्‍स आणल्‍या आहेत आणि मोटरसायकलिंग प्रेमींमध्‍ये स्‍वत:चे एक विशिष्‍ट स्‍थान निर्माण केले आहे. नवीन BMW F 900 R आणि नवीन BMW F 900 XR या डायनॅमिक जोडीच्‍या सादरीकरणासह BMW मोटोर्राड आकर्षक दरांमध्‍ये भारतातील लोकप्रिय मिड-रेंज सेगमेंटला पुनर्परिभाषित व लक्षवेधक बनवण्‍यासाठी सज्‍ज आहे. डायनॅमिक रोडस्‍टर BMW F 900 R ही बहुमूल्‍य व आकर्षक बाइक प्रत्‍येकवेळी अस्‍सल राइडिंग मौजमजेचा आनंद देते. अॅडवेन्‍चर स्‍पोर्टस् टूरर BMW F 900 XR च्‍या शक्तिशाली डिझाइनसह संयोजित अद्वितीय कामगिरी अस्‍सल XR च्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण व भावी-केंद्रित स्‍टाइलमध्‍ये लांबच्‍या अंतरापर्यंत विनाव्‍यत्‍यय राइडिंगचा आनंद देते. या दोन्‍ही बाइक्‍सवरील स्‍पोर्टी राइडिंग, अगदी सुलभ हँडलिंग आणि इक्विपमेण्‍ट पर्यायांची अद्वितीय रेंज अनोख्‍या रोमांचक राइडिंगचा अनुभव घेत असलेल्‍यांसाठी मूल्‍यवर्धित पॅकेज देईल.''

नवीन BMW F 900 R एकाच व्‍हेरिएण्‍टमध्‍ये ऑफर करण्‍यात येईल, तर नवीन BMW F 900 XR स्‍टॅण्‍डर्ड व प्रो व्‍हेरिएण्‍टमध्‍ये सादर करण्‍यात येईल. एक्‍स-शोरूम किंमती पुढीलप्रमाणे- 

BMW F 900 R                                    :           INR 09,90,000
BMW F 900 XR Standard      :           INR 10,50,000
BMW F 900 XR Pro                :           INR 11,50,000

*इन्‍वॉईसिंगच्या वेळी अस्तित्वात असलेली किंमत लागू होईल. डिलिव्‍हरी एक्‍स-शोएक्स शोरूम किंमती (GST सह) (कम्‍पेन्‍शेसन सेससह) लागू होतील. परंतु त्यात रोड टॅक्‍सRTO स्‍टॅट्युअरी टॅक्‍सेस / शुल्क, इतर लोकल टॅक्‍स / सेस लेव्‍हीज आणि इन्‍शुरन्‍स या गोष्टी त्यातून वगळल्या जातील. किंमत व पर्याय पूर्वसूचनेशिवाय बदलणे अपेक्षित आहे. अधिक माहितीसाठी कृपया स्थानिक प्राधिकृत BMW मोटोर्राड डिलरशी संपर्क साधावा.

नवीन BMW F 900 R ब्‍लॅक स्‍टॉर्म मेटालिक आणि स्‍टाइल स्‍पोर्ट हॉकेन्‍हेम सिल्‍व्‍हर मेटालिक / रेसिंग रेड या रंगांमध्‍ये उपलब्‍ध आहे. नवीन BMW F 900 XR लाइट व्‍हाइट आणि स्‍टाइल स्‍पोर्ट रेसिंग रेड पेंटवर्क या रंगांमध्‍ये उपलब्‍ध आहे.

संपूर्ण मन:शांतीसाठी आणि प्रत्‍येकवेळी विनाव्‍यत्‍यय आनंददायी मोटरसायकलिंग प्रवासाच्‍या खात्रीसाठी नवीन BMW F 900 R आणि नवीन BMW F 900 XR 'तीन वर्षे, अमर्यादित किलोमीटर्स'साठी स्‍टॅण्‍डर्ड वॉरंटीसह येतात. तसेच वॉरंटी चौथ्‍या व पाचव्‍या वर्षांपर्यंत वाढवण्‍याचा पर्याय देखील आहे. रोडसाइड असिस्‍टण्‍स24x7 365 दिवसांचे पॅकेज ब्रेकडाऊन व टोइंगच्‍या स्थितींमध्‍ये अधिक सेवा मिळण्‍याची खात्री देतात.

नवीन BMW F 900 R आणि नवीन BMW F 900 XR भारतातील दिल्‍ली (ल्‍यूटयेन्‍स मोटोर्राड), मुंबई (नवनीत मोटर्स), पुणे (बेव्‍हेरिया मोटर्स), चेन्‍नई (KUN मोटोर्राड), बेंगळुरू (टस्‍कर मोटोर्राड), अहमदाबाद (गॅलप्‍स ऑटोहाऊस), कोची (EVM ऑटोक्राफ्ट), हैद्राबाद (JSP मोटोर्राड), इंदौर (म्‍युनिक मोटर्स), लखनौ (स्‍पीड मोटर्स), चंदिगड (कृष्‍णा ऑटोमोबाइल्‍स), जयपूर (प्रताप मोटोर्राड), रायपूर (म्‍युनिच मोटर्स), कोलकाता (OSL प्रेस्टिज), कटक (OSL प्रेस्टिज) आणि रांची (टायटॅनियम ऑटोजअशा प्रमुख केंद्रांमध्‍ये उपस्थित असलेल्‍या BMW मोटोर्राड ऑथोराईज्‍ड डिलर नेटवर्कच्‍या माध्‍यमातून विक्री व सर्विस करण्‍यात येतील. लॉकडाऊन कालावधी संपल्‍यानंतर सर्व सरकारी सूचनांनुसार टेस्‍ट राइड्स व डिलिव्‍हरीज सुरू करण्‍यात येतील.