वाडीत शिवसेनेच्या वर्धापनदिनी वृक्षारोपण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

वाडीत शिवसेनेच्या वर्धापनदिनी वृक्षारोपणनागपूर / अरूण कराळे (खबरबात)
नागपूर (ग्रामीण) युवासेना तर्फे शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमीत्य ४०० महिलांना रेशन किट व छत्री वाटप करुन  रघुपती नगर येथे वृक्षारोपणचा कार्यक्रम पार पडला. यावेळी  खासदार कृपाल तुमाने ,युवासेना जिल्हा प्रमुख हर्षल काकडे ,शिवसेना सहसंपर्क प्रमुख दिवाकर पाटणे ,शिवसेना संघटन प्रमुख संतोष केचे ,उपतालुका प्रमुख रुपेश झाडे , विलास भोंगळे , शत्रृग्घसिंह परीहार ,दिलीप चौधरी ,युवासेना हिंगणा विधानसभा संघटन प्रमुख विजय मिश्रा ,जिल्हा सरचिटणीस कपील भलमे ,तालुका प्रमुख अखिल पोहणकर , उपस्थित होते.


सर्वप्रथम लद्दाखच्या गलवान खोऱ्यात चीनने केलेला भ्याड कृत्याचा निषेध करुन  शहीद भारतीय जवानांना श्नद्धांजंली अर्पण केली  . चीनच्या या आगळीकीमुळे आम्हाला दुःख झाल्याचे श्रद्धांजली वाहतांना स्पष्ट केले . चीनी मालावर बहीष्कार घालण्याचे व भारतीय वस्तु  वापरण्याचे आवाहन केले .
यावेळी शहरप्रमुख  सचिन बोंबले  , शुभम डवरे ,पंकज कौंडण्य ,मोहित कोठे,पिंटू पोहनकर,रंजीत सोनसरे,संदीप विधळे, अखिलेश सिंग, क्रांतिसिंग,लोकेश जगताप,अमीत चौधरी , राहूल ठाकरे ,मोनिका राऊत ,केसरी बोरडकर , आशा कडु ,श्रद्धा राऊत प्रामुख्याने उपस्थित होते .