हिंगणा तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरणार का? रमेशचंद्र बंग - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१९ जून २०२०

हिंगणा तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरणार का? रमेशचंद्र बंग


नागपूर / अरूण कराळे (खबरबात) 
हिंगणा तालुक्यात कोरोनाचा हॉटस्पॉट बनत असून रोज नवीन रुग्णांची भर पडत आहे तेव्हा जिल्हा प्रशासनाने हिंगणा तालुक्यात अधिक लक्ष द्यावे अन्यथा हिंगणा तालुका कोरोनाचा  हॉटस्पॉट ठरणार का असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी केला आहे .

 हिंगणा तालुका हा औद्योगिक वसाहतींचा तालुका असून हिंगणा व बुटीबोरी अश्या दोन एमआयडीसी आहेत. हिंगणा एमआयडीसी परिसराला लागून असलेल्या नीलडोह डिगडोह, इसासणी व वानाडोंगरी ह्या दाट लोकं वस्तीच्या वसाहती असून याठिकाणी कामगार वर्गाचे वास्तव्य मोठया प्रमाणात आहे. 

आणि येथेच कोरोनाचे रोज नवीन रुग्ण भेटत असून हा परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट बनण्याकडे वाटचाल करीत आहे. अनलॉक एक नुसार काही अटी शर्ती वर कंपन्यांना उत्पादनास परवानगी देण्यात आली आहे. परंतु याच  परिसरात कोरोना फोफावत आहे त्यामुळे काही काळासाठी एमआयडीसी पुर्णतःहा बंद करून टाळेबंदी अधिक कडक करावी.
 तर हिंगणा तालुक्यातील संशयित कोरोणा रुग्णाच्या चाचण्या अधिक जलद प्रमाणात करण्यात याव्या, परिसरातील पण  लोकवस्ती पासून दूर संशयित कोरणा रुग्णाच्या विलगीकरणासाठी शासनाने उपाययोजना करावी, मार्केट परिसर दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ सुरु राहू नये,स्थानिक प्रशासनाने नियमित निर्जंतुकीकरण करावे व कोरोना पासून बचाव करण्याकरिता जनजागृती करावी, ग्रामपंचायतीन निधी अभावी कोरोनाशी सामना करण्यास अडचणी निर्माण होत आहेत तेव्हा कोरोना रुग्ण असलेल्या ग्रामपंचायतींना शासनाने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत तात्काळ अधिकचा निधी उपलब्ध करून द्यावा.

आदी बाबीकडे जिल्हा प्रशासनाने अधिक लक्ष घालावे, असेही रमेशचंद्र बंग म्हणाले. तसेच लोकांनी सुद्धा शासनाच्या सूचनांचे पालन करावे प्रशासनास सहकार्य करावे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पधादिकारी,कार्यकर्ते यांनी या संकट काळात गोर गरिबांना मदत करा, सामान्यांच्या अडचणी समजून त्या सोडविण्याच्या प्रयत्न करा असे आवाहन सुद्धा बंग यांनी केले.