जगप्रसिद्ध मोहूर्ली गावात प्रशासनाच्या उदासीनतेमुळे भीषण पाणी टंचाई - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ जून २०२०

जगप्रसिद्ध मोहूर्ली गावात प्रशासनाच्या उदासीनतेमुळे भीषण पाणी टंचाईमोहर्ली येथे कोरोना काळात सामाजिक 
अंतराच्या नियमाला हळताल 
चंद्रपूर/(खबरबात):
जगात ओळख असणाऱ्या अशा चंद्रपूर जिल्ह्यातील मोहूर्ली येथील गावकरी मागील आठवडाभरापासून ग्रामपंचायत आणि संबंधित पाणी पुरवठा यंत्रणेच्या ढिसाळ आणि अनियोजित कारभारामुळे पेय जलासाठी त्रस्त झाली आहे.


ऐन कोरोना काळात गावात भिषण पाण्याची समस्या निर्माण झाली आहे,कोरोना संसर्गाची भीति असून सुद्धा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे गावकऱ्यांना सर्व नियमांना हरताळ फासून घरात पीण्याच्या व वापरण्याच्या पाण्याचासाठा हा सार्वजनिक विहिरीवरून करावा लागत आहे. गावकरी सामाजिक अंतर न पाळता विहिरिवर पाण्यासाठी गर्दी करीत आहेत.

मोहूर्ली गावात मुख्यमंत्री पेय जल योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कामातील अव्यवस्था आणि संबधित विभागाच्या उदासीनतेमुळे सदर गंभिर स्थिती निर्माण झाली असून यावर त्वरित उपाययोजना करून पाण्याचा भिषण समस्येपासून गावकऱ्यांना मुक्त करावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

विहिरीवर होणाऱ्या गर्दीमुळे गावात कोरोणाची भीती आजही कायम आहे. महिला मंडळी विहिरीवर घाबरत पाणी भरत आहेत. याकडे प्रशासनाच्या लवकरात लवकर लक्ष घातले नाही तर गावात देखील कोरोनाचा शिरकाव होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.