चंद्रपुर:पत्नीच्या पेटत्या चितेवर पतीने घेतली उडी;ती नाही तर मी हि नाही - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२३ जून २०२०

चंद्रपुर:पत्नीच्या पेटत्या चितेवर पतीने घेतली उडी;ती नाही तर मी हि नाही

पत्नीच्या पेटत्या चितेवर पतीनं घेतली उडी, अवघ्या 3 महिन्यांतच मोडला संसाराचा डाव!
चंद्रापुर/प्रतिनिधी:
पत्नीच्या अंत्यसंस्कारादरम्यान पतीने चितेवर उडी घेतल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी ४ वाजता गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथे घडली.

लोकांनी वेळीच धाव घेऊन त्याला वाचविले. पण, नंतर त्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. 

भंगाराम तळोधी येथील रूचिता चिट्टावारचा विवाह चंद्रपूर येथील किशोर खाटिक याच्याशी १९ मार्च रोजी झाला. किशोर चंद्रपुरातील आरटीओ कार्यालयात वाहनचालक प्रशिक्षण केंद्रात मानधन तत्त्वावर काम करीत होता. या दोघांच्या संसारात तिसरा पाहुणाही येणार होता. सारे काही आनंदात असतानाच चार दिवसांपूर्वी आईची प्रकृती बिघडल्याने ती माहेरी आली. दोन दिवसांपूर्वी किशोर तिला घेण्यासाठी गावाला आला. पण, रविवारी तिचा मृतदेह गावालगतच्या विहिरीत आढळून आला.
बायकोची आत्महत्या, अंत्यसंस्कारावेळी नवऱ्याचीही चितेत उडी, वाचवलेल्या नवऱ्याने पुन्हा विहिरीत जीव दिला
चंद्रपुरात शवविच्छेदनानंतर तिच्या पार्थिवावर भंगाराम तळोधी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्व नातेवाईक परत घराकडे येत असतानाच किशोर स्मशानभूमीकडे धावत सुटला. काही कळायच्या आत त्याने पेटत्या चितेवर उडी घेतली. नातेवाइकांनी वेळीच धाव घेऊन त्याला बाहेर काढले. नंतर कुणाला काही कळायच्या आत विहिरीत उडी घेतली. यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेने दोन्ही कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.