धक्कादायक;अल्पवयीन मुलीने मृत्युला का कवटाळले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१० जून २०२०

धक्कादायक;अल्पवयीन मुलीने मृत्युला का कवटाळले

वाडीत अल्पवयीन मुलीची आत्महत्या
नागपूर/ अरूण कराळे( खबरबात)
येथील डॉ. आंबेडकरनगर,सम्राट अशोक चौक निवासी अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
 प्राप्त माहितीनुसार मृतक नेहा मुकेश राऊत (वय १५) असून तिने दहावीची परीक्षा दिली होती. नेहाने  मंगळवार ९ जुन रोजी  सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास राहत्या घराच्या स्वयंपाक खोलीतील  पंख्याच्या हुकला ओढणीने गळ्याला फास लावून आत्महत्या केली.

तिची लहान बहीण घराबाहेर होती व आई-वडील दोघेही कामावरून परत यायचे होते. काही वेळानंतर लहान बहीण स्वयंपाक घरात गेली असता तिला नेहा फाशी घेतलेल्या अवस्थेत दिसताच ती घाबरून गेली ओरडून बाहेर येऊन रडत शेजार्‍यांना सांगितले. शेजार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही वार्ता मृतकाच्या आई-बाबांना समजताच घरी पोहोचले नागरिकांच्या मदतीने नेहाला खाली उतरून जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तपासणीनंतर डॉक्टरनी मृत घोषित केले. वाडी पोलिसांनी पंचनामा केला व रुग्णालयातून मृतदेह नागपूरला पाठविण्यात आला.नेहाने आत्महत्या का केली याचे निश्‍चित कारण रात्री कळू शकले नाही.वाडी पोलीस तपास करीत आहे.