ब्राम्हण सेना फाऊंडेशनतर्फे कोरोना योद्धाचा सत्कार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

ब्राम्हण सेना फाऊंडेशनतर्फे कोरोना योद्धाचा सत्कार


नागपूर / अरूण कराळे ( खबरबात) 
वाडी ब्राम्हण सेना फाऊंडेशन तर्फे पत्रकार ,डॉक्टर ,वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने ब्राह्मण सेना फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मनीष त्रिवेदी, वाडी ब्राम्हण सेना अध्यक्ष राजू मिश्रा, महासचिव अभिजितराज चौबे ,विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष उमरेड ,नागपूरचे कैलाश शर्मा वाडी ब्राम्हणसेना संघटक प्रमुख रामराज मिश्रा,उपाध्यक्ष अनुप त्रिपाठी यांच्या हस्ते पत्रकार अरूण कराळे ,पत्रकार सुनील शेट्टी ,पत्रकार विकास बनसोड ,डॉ. हदयनाथ मार्कंड ,वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक ,श्याम पांडे ,सुनिल पांडे यांचा प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला .
कोरोना विषाणूचा भय असतांनाही स्वतःचा जीव धोक्यात घालुन मजुरवर्गाला मदत करणे ,अन्नधान्य वाटपात सहकार्य करणे ,पत्रकारीतेच्या माध्यमातुन कोरोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी लोकांना जागृत करणे आदी कामे योग्य रितीने हाताळले आहे .
त्यांचे कार्य समाजाला बरेच काही सांगून जात आहे .अशा योद्धाचे कौतुक व्हायलाच पाहीजे . त्यांच्या चांगल्या कामाची पावती म्हणून ब्राम्हण सेना फाऊंडेशन तर्फे पत्रकार ,डॉक्टर ,वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार केल्याचे वाडी ब्राम्हण सेनेचे अध्यक्ष राजू मिश्ना यांनी सांगीतले . यावेळी विश्वास नंदनकर ,राकेश बनकर ,उज्वला गुडधे ,गौतम देशभ्रतार ,विजयभैय्या मिश्रा ,महेन्द्र शर्मा,अरुण त्रिपाठी , विजय शुक्ला ,राकेश त्रिपाठी, शिवम् शुक्ला, निरज त्रिपाठी, सुभाष मिश्रा ,पवन मिश्ना दिपा पचौरी प्रामुख्याने उपस्थित होते.